Saturn in purvabhadrapada nakshatra: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो. सध्या शनी त्याच्या मूळ त्रिकोण राशीत उपस्थित असून तो २०२५ मध्ये मीन राशीत तब्बल ३० वर्षानंतर राशी परिवर्तन करणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या शतभिषा नक्षत्रामध्ये असून तो २७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजून ४२ मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करेल. तसेच तो २८ एप्रिल २०२५ पर्यंत याच नक्षत्रामध्ये असेल. या नक्षत्राचा स्वामी ग्रह गुरू आणि रास मीन आहे. शनीचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

शनीचे नक्षत्र परिवर्तन करणार कमाल

मिथुन

शनीचा पूर्व भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश मिथुन राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आरोग्य चांगले राहील.

कन्या

शनीचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशींच्या लोकांसाठी खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. परदेशी जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल.

हेही वाचा: २०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना शनीचा पूर्व भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश खूप लाभदायी असेल. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)