Shani Nakshtra : ज्योतिषशास्त्रानुसार शनि हा खूप कमी वेगाने चालणारा ग्रह मानला जातो. शनिला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालावधी लागतो.सध्या शनि कुंभ राशीमध्ये विराजमान आहे आणि २०२५ पर्यंत शनि याच राशीत राहणार आहे. मात्र शनिने ६ एप्रिलला नक्षत्र परिवर्तन केले आहे. शनिच्या नक्षत्र परिवर्तनामुळे गुरूचे नक्षत्र पूर्वाभाद्रपदमध्ये गोचर करणार आहे आणि ३ ऑक्टोबरपर्यंत याच नक्षत्रामध्ये विराजमान राहतील.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शनि आणि राहु एकत्र येऊन अनेक राशींच्या अडचणी वाढवल्या आहेत. शनि कुंभ राशीमध्ये गोचर करताना पहिल्यांदा शुभ फळ देणार आहे. शनिचे गुरु नक्षत्रामध्ये येणे, शुभ मानले जाते. भाद्रपदचा अर्थ होतो, शुभ पावले असणारा म्हणजेच कुंडलीमध्ये ज्याचे आगमन होणे शुभ मानले जाते. अशावेळी शनिच्या नक्षत्र परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होणार, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

वृषभ राशी

वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे आणि शनिबरोबर चांगली मैत्री आहे. अशात शनिचे नक्षत्र परिवर्तन या राशीच्या लोकांसाठी विशेष लाभदायक असणार आहे. करिअर आणि व्यवसायात भरपूर लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी लोक कामाचे कौतुक करतील. या काळात प्रगतीबरोबरच पदोन्नती होऊ शकते. कार्यक्षेत्रमध्ये खूप चांगला फायदा दिसून येईल. नशीबाचा साथ मिळेल. थांबलेली कामे मार्गी लागतील. अनेक अडचणी दूर होतील. कुटूंबाबरोबर चांगला वेळ घालवता येईल.

हेही वाचा : निरागस चिमुकल्यांनी काढले शिक्षिकेचे चित्र, विद्यार्थ्यांचा व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना शनिच्या नक्षत्र परिवर्तनाचा लाभ होऊ शकतो. जे लोक व्यवसाय करता त्यांना फायदा होऊ शकतो. यामुळे सिंह राशीच्या लोकांना धनलाभ होईल पण त्याचबरोबर व्यवसायात सुद्धा वृद्धी होईल. जर कोणाला वैवाहिक आयुष्यात अडचणी येत असेल तर ही समस्या लवकरच दूर होऊ शकते. जोडीदाराला जास्तीत जास्त वेळ देता येईल.

कन्या राशी

कन्या राशीचे लोकांना शनिचे नक्षत्र परिवर्तन शुभ ठरणार आहे. कन्या राशीच्या लोकांना या दरम्यान अनेक बदल दिसून येतील. यांचे नशीब उजळून येईल. खूप दिवसांपासून येणारी समस्या दूर होईल. नवीन कामामध्ये यश मिळेल. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज दूर होईल. नोकरी करणाऱ्या लोकाची पदोन्नती होऊ शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)