Budh Asta In Shani Rashi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या ग्रह राशी व नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व मानव व सृष्टीवर दिसून येतो. ग्रहाचा जेव्हा कोणताही ग्रह सूर्याच्या अधिक जवळ असतो तेव्हा त्याचा प्रभाव हा अस्ताला जात असतो ज्यामुळे ग्रहांची शक्ती कमी होऊ शकते. येत्या ७ दिवसात म्हणजेच २८ फेब्रुवारीला बुध ग्रह शनीच्या प्रिय राशीत कुंभ मध्ये अस्त होणार आहे. अभ्यासकांच्या माहितीनुसार २८ फेब्रुवारीला सकाळी ८ वाजून ३ मिनिटांनी बुधाचा कुंभ राशीत अस्त होत आहे तर ३१ मार्चला दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी बुध ग्रहाचा पुन्हा उदय होणार आहे. अस्त अवस्थेतच बुध ग्रह कुंभ राशीतून मेष राशीत गोचर करणार आहे व ३१ मार्च मेष राशीतच बुध ग्रहाचा उदय होईल. बुध ग्रहाचा उदय होईपर्यंत तब्बल महिनाभर ४ राशींच्या भाग्यात अत्यंत शुभ व धनदायक योग तयार होत आहेत. या चार भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होणार हे जाणून घेऊयात…

२८ फेब्रुवारीपासून ‘या’ ४ राशी होणार अपार श्रीमंत?

मेष (Aries Zodiac)

मेष राशीत बुध ग्रहाचा उदय होणार आहे. पण तत्पूर्वी महिनाभर या राशीला प्रचंड धनलाभाचे योग आहेत. आपल्याला वायपर वृद्धीचे संकेत देणारी ग्रहांची हालचाल होत आहे. जर आपण नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच आपल्याला सोन्यासारखी संधी लाभू शकते. तुमच्या आत्मविश्वासाचे खच्चीकरण केले जाऊ शकते पण अजिबात घाबरून जाऊ नका, परिस्थितीला सामोरे गेल्याने तुमच्या कर्तबगारीत वाढ होईल पण यामुळे तुमच्यावर अनेक जण विश्वास टाकू लागतील. तुम्हाला प्रचंड धनलाभ एकरक्कमी होऊ शकतो पण त्यामुळे भांबावून जाऊ नका. उलट तुमच्या मिळकतीतील काही टक्के गुंतवणूक करा. यामुळे तुम्हाला भविष्यात बक्कळ पैसा मिळू शकतो.

कर्क (Cancer Zodiac)

बुध ग्रह हा कर्क राशीचा तिसऱ्या व बाराव्या स्थानाचा स्वामी आहे, आपल्याला येत्या महिन्याभरात आर्थिक धनलाभ होऊ शकतो मात्र यासाठी तुम्हाला अत्यंत स्मार्ट गुंतवणूक करावी लागणार आहे. आपल्याला वाडवडिलांच्या संपत्तीचा सुद्धा लाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीचा व शेअर मार्केटच्या चढउताराचा सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. जोडीदारासह थोडं जुळवून घ्यावं लागेल, येत्या काळात वैवाहिक काळ तुम्हाला प्रगतीपासून दूर खेचू शकतात पण तुम्ही प्रेमाने जोडीदाराचा विश्वास जिंकून घ्या. आरोग्य उत्तम राहील.

तूळ (Libra Zodiac)

बुध ग्रह हा तूळ राशीच्या नवव्या व बाराव्या स्थानाचा स्वामी आहे तर २८ फेब्रुवारीला बुध तूळ राशीच्या पाचव्या स्थानी स्थिर होणार आहे. बुध ग्रहाच्या उलाढालीमुळे आपली आध्यत्मिक आवड वाढू शकते. धार्मिक कारणांनी आपल्याला आर्थिक लाभाचे योग आहेत. तुम्हाला व्यवसायातून गुंतवणुकीची ऑफर मिळू शकते व परिणामी धनलाभाचे सुद्धा योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी येणारा काळ अत्यंत लाभदायक असू शकतो. या काळात तुम्हाला अभ्यासात लक्ष द्यावे लागू शकते पण तुमचे अडथळे दूर होऊ शकतील. सोन्याच्या गुंतवणुकीची संधी लाभेल.

हे ही वाचा<< होळी २०२३ च्या आधी शनीदेव ‘या’ ४ राशींना करणार श्रीमंत? कुंभ राशीत उदय होताच बक्कळ धनलाभाचे योग

मकर (Capricorn Zodiac)

मकर राशीच्या गोचर कुंडलीत बुध ग्रह हा दुसऱ्या स्थानी अस्त होणार आहे. बुध ग्रह शनीच्या राशीत स्थिर झाल्याने आपल्याला एखाद्या नव्या सुरुवातीची संधी मिळू शकते. तुम्हाला नव्याने आयुष्य जगण्यास उमेद देणारा एखादा प्रसंग घडू शकतो. वडिलांसह नाते सुधारण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला महिनाभर अत्यंत जिद्दीने काम करावे लागेल पण तुमच्या कठोर परिश्रमांना दैव व नशिबाची साथ लाभू शकते. तुमच्याकडे सेव्हिंग वाढू शकते.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)