Shani Dev Margi In Meen 2025: न्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनीची चाल ही अत्यंत संथ गतीची असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान अडीच ते कमाल साडेसात वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनि महारांजांचे राशीपरिवर्तन मीन राशीत झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली चाल मार्गी किंवा वक्री करत असतात. १३ जुलै २०२५ रोजी शनि देव वक्री झाले होते. पण आता, २८ नोव्हेंबर २०२५ पासून शनि देव पुन्हा मार्गी होणार आहेत. शनी मार्गी होताच काही राशींचे अच्छे दिन सुरु होऊ शकतात. काही व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो. शनी मार्गी होताच कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात…

नोव्हेंबरपासून ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब चमकेल!

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना शनि मार्गी झाल्यानंतर जबरदस्त लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारु शकते, नोकरी, व्यवसाय किंवा गुंतवणूक यामध्ये मोठा फायदा होऊ शकतो. जे मेष राशीचे लोक नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांचा स्वप्नातला घर खरेदीचा योग साकार होण्याची शक्यता आहे. तसेच गाडी खरेदीसाठी सुद्धा शुभ योग आहे. हे काळ मेष राशीच्या लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि स्थिरता आणणारे ठरु शकते.

कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीच्या मार्गी होण्याचा काळ अत्यंत फलदायी ठरु शकतो. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता प्रबल आहे, तसेच अडकलेले कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात तसेच वैयक्तिक प्रकल्पांमध्ये देखील यश मिळू शकतो. घर आणि गाडी खरेदीसाठी ही वेळ अत्यंत अनुकूल आहे. एकूणच, कुंभ राशीच्या लोकांसाठी ही आर्थिक आणि वैयक्तिक प्रगतीची सुवर्णसंधी ठरु शकते.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी शनि मार्गी होणे म्हणजे बिझनेस, नोकरी आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीचा काळ. पगारवाढ होण्याचे संकेत दिसत आहेत. व्यवसाय वाढीची संधी आहे, तसेच नवीन घर खरेदी करण्यासाठी अनुकूल योग आहे. या काळात जीवनातील मोठ्या अडचणींचे निराकरणही होईल आणि जीवनात स्थिरता, समाधान व आनंद प्राप्त होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि मार्गी होण्याची ही वेळ मेष, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक संपत्ती, घर-बंगल्याची खरेदी, व्यवसायात प्रगती आणि वैयक्तिक सुख मिळवून देणारी काळाची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे या राशींच्या लोकांनी योग्य नियोजन करून या काळाचा फायदा घ्यावा, कारण अशी सुवर्णसंधी प्रत्येकाला वारंवार मिळत नाही.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)