23rd Panchang & Rashi Bhavishya On Shanivar: होळीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज २३ मार्च २०२४ ला काही राशींना शनीचा आशीर्वाद लाभणार आहे. आज सकाळी त्रयोदशी तिथी ७ वाजून १८ मिनिटांनी संपताच चतुर्दशीला प्रारंभ होईल. २३ मार्चला संपूर्ण दिवस रवी योग कायम असणार आहे. तर रविवारी सकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत फाल्गुनी नक्षत्र जागृत असेल. २३ मार्चलाच दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी शुक्राचे पूर्व भाद्रपद नक्षत्रात गोचर होणार आहे. याचाही प्रभाव तुम्हाला तुमच्या राशीवर दिसून येईल. नेमकं मेष ते मीन राशीच्या भाग्यात आज काय आहे हे पाहूया

होळीच्या आधी आज शनी शुक्र युती, कोणाचं नशीब होईल भाग्यशाली?

मेष:- कौटुंबिक सौख्यात रमाल. गरज नसतांना प्रवास करावा लागू शकतो. लहान मुलांच्यात रमून जाल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत. आवडीचे पदार्थ चाखाल.

वृषभ:-ऐक्याची भावना जोपासाल. दिवस मनाप्रमाणे व्यतीत कराल. थोरांशी सल्ला-मसलत कराल. कामात चंचलता येईल. तोंडात साखर ठेवून बोलाल.

मिथुन:-मोकळेपणाने बोलणे टाळाल. पत्नीचा प्रेमळ सहवास मिळेल. झोपेची तक्रार दूर होईल. संसर्गजन्य आजारांपासून काळजी घ्यावी. मानसिक संभ्रम दूर करावा.

कर्क:-उगाचच चंचलता वाढेल. फार विचार करत बसू नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्याल. जोडीदाराचा हट्ट पुरा कराल. जुने विचार मनातून काढून टाकावेत.

सिंह:-कलेसाठी अधिक वेळ काढाल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल. कामात स्थिरता ठेवावी. गप्पांमध्ये वेळ घालवाल. पोटाची काळजी घ्यावी.

कन्या:-कामात जोडीदाराचा हातभार लागेल. प्रगतीची नवीन संधी उपलब्ध होईल. मुलांना नवीन गोष्टी शिकवाल. व्यायामाचे महत्व लक्षात घ्यावे. अपचनाचा त्रास जाणवेल.

तूळ:-काही कामे कमी श्रमात पार पडतील. घरातील वातावरण अस्वस्थ वाटू शकते. नवीन गोष्टी आमलात आणताना विचार करावा. अचानक धनलाभ संभवतो. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे.

वृश्चिक:-गरज नसेल तर प्रवास टाळावा. जोडीदाराचे सौख्य वाढेल. नवीन गोष्टींकडे कल वाढेल. मोहाळा बळी पडू नका. जवळचे मित्र भेटतील.

धनू:-कौटुंबिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यावे. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. कामाचा आनंद घ्याल. लोकोपवादाला बळी पडू नका. जुन्या कामात प्रगती कराल.

मकर:-मानसिक ताण जाणवू शकतो. सतत बडबड कराल. कमिशनचा विचार आधी कराल. आवडते पुस्तक वाचाल. रागावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ:-तुमच्या स्मरणशक्तीचे कौतुक केले जाईल. घरातील साफसफाई कराल. काही सकारात्मक बदल कराल. आवडता छंद जोपासाल. सामुदायिक गोष्टीत लक्ष घालू नका.

हे ही वाचा<< होळीला चंद्र ग्रहण व ४ दुर्मिळ योग बनल्याने ‘या’ राशींच्या नशीबाचं टाळं उघडणार; ‘अशा’ रूपात दारी येईल लक्ष्मी?

मीन:-उगाचच थकवा जाणवेल. सकारात्मक विचार करावेत. हस्तकलेत मन रमवावे. लबाड लोकांचा संग टाळावा. खोट्याचा आधार घेऊ नका.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर