Holi 2024 Shubh Muhurta & Lucky Zodiac Signs: फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या उदय तिथीनुसार रविवार २४ मार्च २०२४ ला होलिका दहन असणार आहे. २५ मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यंदा होळीच्या दिवशी तब्बल चार योग जुळून येत आहेत. यामुळेच या सणाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. होळीच्या दिवशी म्हणजेच २४ मार्चला सर्वार्थ सिद्धी योग, रवी योग, गण्ड योग, बुधादित्य योग असे चार महत्त्वाचे व शुभ योग जुळून येणार आहेत. तर २५ मार्च म्हणजेच धुळवडीच्या दिवशी वृद्धी योग, वाशी योग, सुनफा योग जुळून येतील तसेच बुधादित्यचा प्रभाव सुद्धा कायम राहील. ज्योतिष शास्त्रात हे योग अत्यंत शुभ मानले जातात, हे योग ज्या राशींच्या कुंडलीत महत्त्वाच्या स्थानी तयार होतात त्यांना धन, मन, तन, व मान- सन्मानाच्या बाबत लॉटरीच लागते असं म्हणायला हरकत नाही. ही नशिबाची लॉटरी यंदाच्या होळीला पाच राशींच्या नशिबात दिसून येत आहे, या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया.

होळीच्या दिवशी ‘या’ राशींना चंद्राचं चांदणं सुखावणार

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

होळीच्या दिवशी लागणारे चंद्र ग्रहण मेष राशीसाठी लाभदायक ठरू शकते. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश हाती येईल, व्यवसाय वृद्धीचे सुद्धा संकेत आहेत. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादित करता येईल ज्यामुळे तुमच्या कामासाठी भांडवल उपलब्ध होईल. नात्यांमध्ये एकोपा वाढेल, विशेषस्था पती पत्नीच्या नात्याला वेळ व प्रेमाची जोड मिळू शकते.

People of this zodiac sign will get a lot of money
१४ जूनपर्यंत होणार भरभराट! सूर्य चमकवणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; कमवणार बक्कळ पैसा
200 Years Later Shani Jayanti 2024 Nakshtra Gochar
चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी
Jupiter's movement will give wealth, happiness and prosperity
पुढचे २४ दिवस महत्त्वाचे! देवगुरू बृहस्पतींची चाल ‘या’ तीन राशींना देणार ऐश्वर्य, सुख-समृद्धी अपार
Valsad in the south, the tribal region in Gujarat
नळ आहेत पण पाणी नाही; कुठे आहे ही परिस्थिती?
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
Jupiter's zodiacal change will be favourable for Students
गुरु ग्रहाच्या राशीपरिवर्तनाची होणार कृपा; ‘या’ राशीच्या विद्यार्थ्यांना मिळणार भरपूर यश
Stridhan belongs to the woman husband has no right over it
स्त्रीधन महिलेचेच, त्यावर पतीचा अधिकार नाही…
Loksatta kutuhal Artificial intelligence Technology The Turing Test Mirror test
कुतूहल: स्वजाणिवेच्या पात्रता कसोट्या

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीच्या नशिबात या कालावधीत मोठा धनलाभ दिसून येत आहे. तुम्ही जरा डोळे उघडून संधींकडे पाहण्याची गरज आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी तुमचे गैरसमज आड येऊ देऊ नका. नोकरदारांना आपल्या वाणीच्या जोरावर काही महत्त्वाची कामे मार्गी लावता येऊ शकतात. तुमच्या नशिबात धनलाभाच्या स्रोत तुमच्याच रूपात आहे. स्वतःविषयीचे गैरसमज सोडवण्यात यश येईल.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीला चंद्र ग्रहण शुभ ठरू शकते. पण तुमचे कर्म व विचार शुद्ध असणे आवश्यक आहे. सिंह राशीच्या नशिबात मुख्यतः बुधादित्य योग अधिक लाभदायक असेल. आदित्य म्हणजेच सूर्य देव हे तुमच्या राशीचे स्वामी असल्याने यावेळी त्यांची बुधासह झालेली युती तुम्हाला बुद्धी व वाणीचे वरदान देईल व याच बळावर आपण धनलाभ मिळवू शकता. प्रेमाच्या नात्याला घरून पाठिंबा मिळू शकतो.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

धनु राशीच्या मंडळींसाठी चंद्र ग्रहण व जुळून आलेले योग हे प्रभावशाली ठरणार आहेत. तुम्ही सुरु केलेले प्रत्येक काम पूर्णत्वाला नेऊ शकता. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश लाभू शकते. वाडवडिलांच्या संपत्तीशी संबंधित जुने वाद मार्गी लागतील व त्यातून धनलाभाचे मार्ग मोकळे होतील.

हे ही वाचा<< ‘दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ’, अजित पवार व शरद पवारांची पत्रिका सांगते.. वाचा ज्योतिषतज्ज्ञ उल्हास गुप्तेंचा कयास

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीच्या मंडळींना वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीच्या अनुषंगाने चंद्र ग्रहण शुभ सिद्ध होऊ शकते. नोकरीमध्ये वरिष्ठांचे मन वळवण्यात यश येईल. नात्यांमध्ये काही प्रमाणात बिघाड होऊ शकतो पण संयम व प्रेमाने गोष्टी हाताळल्यास किमान एकमेकांच्या प्रति आदर कायम राखता येईल. तुम्हाला भागीदारीच्या कामातून धनलाभाचे योग संभवत आहेत.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)