Shani-Surya Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवरही पाहायला मिळतो. सध्या न्यायदेवता शनी मीन राशीत असून ग्रहांचा राजा सूर्य कर्क राशीत विराजमान आहे. येत्या काही दिवसात शनी-सूर्य नवपंचम राजयोग निर्माण करेल. पंचांगानुसार, २४ जुलै रोजी संध्याकाळी ४ वाजून ५१ मिनिटांनी शनी आणि सूर्य १२० डिग्रीवर असतील. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. या योगाचा १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम पाहायला मिळेल.
नवपंचम राजयोग करणार प्रत्येक इच्छा पूर्ण
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग खूप फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुमचे भाग्य चमकेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात खूप आनंद साजरा कराल. या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींना हा राजयोग खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही नवपंचम राजयोग अनुकूल ठरेल. आयुष्यातील अडथळे दूर होतील. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. आकस्मिक धनलाभ होतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)