Shani Transit: कर्मफळ देणाऱ्या शनी देवाला ज्योतिषशास्त्रात कठोर ग्रह मानले जाते, कारण ते माणसाला त्याच्या कर्मांप्रमाणेच फळ देतात. जवळपास ३० वर्षांनंतर शनी गुरुची रास म्हणजे मीन राशीत आले आहेत आणि आता २०२७ पर्यंत इथेच राहणार आहेत. या काळात त्यांच्या गतीत बदल होणार असून त्याचा परिणाम देश-विदेशात दिसणार आहे.

जुलै महिन्यात शनी मीन राशीत वक्री झाले होते आणि सध्या त्याच अवस्थेत आहेत. नोव्हेंबर महिन्यात ते मार्गी होतील. शनी मार्गी झाल्यावर काही राशींच्या लोकांना भाग्य साथ देईल. नोकरी आणि व्यवसायात फायदा, आर्थिक वाढ आणि स्थिरता मिळण्याची शक्यता असेल. चला तर मग पाहू या कोणत्या राशींना हा फायदा होणार आहे. वैदिक पंचांगानुसार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी शनी मीन राशीत मार्गी होतील.

वृषभ राशी (Taurus Horoscope)

शनी ग्रहाची सरळ चाल तुमच्यासाठी खूप अनुकूल ठरू शकते. या काळात शनी तुमच्या राशीपासून ११व्या भावात असतील, ज्याला उत्पन्न आणि लाभाचा भाव मानला जातो. या स्थितीत तुमच्या कमाईत चांगली वाढ होण्याचे योग आहेत. या काळात नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील आणि चांगला धनलाभ होऊ शकतो. व्यवसायात नवीन संबंध तयार होतील आणि एखादी महत्त्वाची डील होऊ शकते, जी भविष्यात मोठा नफा देईल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील आणि आर्थिक स्थिरता वाढेल. हा काळ फक्त पैसे कमवण्याची संधी देणार नाही तर तुम्ही पैसे साठवूही शकाल.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी शनीची सरळ चाल फार लाभदायक ठरू शकते. भाग्यभावात शनी मार्गी झाल्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. अडकलेली कामे पूर्ण होतील आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ असेल. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुमच्या मेहनतीमुळे कंपनीला मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. या काळात तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळतील. पगार वाढण्याचेही योग आहेत. व्यवसायात चांगला फायदा मिळेल. आधी केलेल्या गुंतवणुकीतून आता चांगला नफा मिळू शकतो, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल दिसतील. वैवाहिक आयुष्यातील अडचणी दूर होतील.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

शनी ग्रह मार्गी होणे कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप चांगले परिणाम देऊ शकते. शनिदेव स्वतः या राशीचे स्वामी आहेत. ते दुसऱ्या भावात मार्गी होतील, ज्याला ज्योतिषात धन आणि वाणीचा भाव मानला जातो. या राशीत शनीची साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या काळात अचानक धनलाभ होऊ शकतो आणि अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही चांगला नफा मिळेल. ज्या लोकांचे करिअर वाणी, संवाद किंवा मार्केटिंगशी संबंधित आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष फायदेशीर ठरेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन, नवीन जबाबदाऱ्या किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो. व्यापाऱ्यांसाठी नवीन करार आणि नफ्याच्या संधी मिळतील. तुमची लोकप्रियता वाढेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)