Dwirdwadash Yoga In Kundli: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा कोणताही ग्रह नक्षत्र किंवा राशी परिवर्तन करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्वच १२ राशींवर दिसून येतो. नववर्षापूर्वीच काही राशींवर कर्मदाता शनि व ग्रहांचा राजा सूर्यदेव यांच्या कृपेने अपार धनसंपत्तीचा वर्षाव होणार अशी चिन्हे दिसत आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार शनि व सूर्याने युती करून द्विर्द्वादश योग तयार केला आहे . यामुळे मेष ते मीन या १२ राशींवर शुभ अशुभ प्रभाव दिसून येणार आहे. नेमका तुमच्या राशीला या शुभ राजयोगाचा फायदा होणार का हे जाणून घेऊयात..

द्विर्द्वादश योग कसा व कधी तयार होणार?

वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगितल्यानुसार जेव्हा शनि व सूर्य यांच्यात युती होऊनही शत्रू भाव कायम असतो तेव्हा त्यातून द्विर्द्वादश योग तयार होतो. सध्या ग्रहांची स्थिती पाहता येत्या २४ तासात म्हणजेच १६ डिसेंबरपासून ते नववर्षात २४ जानेवारीपर्यंत द्विर्द्वादश योग कायम असणार आहे. या काळात शनि व सूर्य एकमेकांच्या दुसऱ्या व बाराव्या राशीत स्थिर असणार आहेत. शत्रू भाव असल्याने हा योग अशुभही मानला जातो. मात्र यंदा याच योगाने काही राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते.

heat waves, weather,
यंदाचा एप्रिल महिना उष्णतेच्या लाटांचा; पुढील पाच दिवस पारा आणखी वाढणार
Bhandara District Swelters as Temperature Hits 43 Degrees Celsius Early in April
उन्हाच्या झळा : भंडाऱ्याचा पारा ४३ अंशावर , एप्रिल महिन्यात प्रथमच एवढे तापमान
Weather Forecast
भारतात एप्रिल-मे महिन्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाचा इशारा
April 2024 Monthly Horoscope in Marathi
३० एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन; १२ राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी? वाचा राशी भविष्य

द्विर्द्वादश योग बनल्याने ‘या’ राशींना मिळू शकते श्रीमंती

सूर्य व शनिच्या युतीतून द्विर्द्वादश योग बनल्याने सिंह व मीन राशीचे भाग्य रातोरात उजळण्याची शक्यता आहे. आपल्याला धनलक्ष्मीचा आशीर्वाद लाभल्याने येत्या काळात अपार व दीर्घकाळ टिकणारी संपत्ती तुमच्याकडे येऊ शकते. तुम्हाला पुढच्या महिन्याभरात नवीन आर्थिक स्रोत लाभू शकतात. जर कुठे पैसे अडकले असतील तर ते सुद्धा पुन्हा मिळवता येतील. जुन्या गुंतवणुकीचा आर्थिक लाभ येत्या काळात आपल्याला होऊ शकतो.

‘या’ राशींना द्विर्द्वादश योग देऊ शकतो धनलाभ पण…

द्विर्द्वादश योग बनल्याने मेष, कर्क, तूळ , वृश्चिक, वृषभ व कुंभ या राशींवर संमिश्र प्रभाव असणार आहे. या काळात तुम्हाला कामासाठी पळापळ करावी लागू शकते. यामुळे आरोग्याची हेळसांड होण्याची शक्यता आहे. पण तुमच्या मेहनतीचे फळ मात्र इतके मोठे असणार आहे की तुम्ही सर्व शीण विसरून जाऊ शकता. तुम्हाला कामाच्या नवीन संधी लाभण्याची शक्यता आहे. अशावेळी तुम्हाला कुटुंबाच्या बाबत थोडी तडजोड करावी लागू शकते पण तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचा योग आहे.

हे ही वाचा<< कर्क, सिंह व कन्या राशीसाठी 2023 हे वर्ष कसे असणार? शनिदेव ‘या’ व्यक्तीच्या रूपात देऊ शकतात प्रचंड धनलाभ

द्विर्द्वादश योग ‘या’ राशींसाठी ठरू शकतो अशुभ

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि व सूर्य एकत्र आल्याने धनु , मिथुन, कन्या व मकर राशीच्या समस्या येत्या काळात वाढू शकतात. तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. विशेषतः जवळच्या व्यक्तीकडून धोका मिळण्याचे संकेत आहेत. तुमच्या कामाच्या ठिकाणी कुणालाही विश्वास ठेवणे शक्यतो टाळा, तुमचे काम चोख करूनही केवळ आंधळा विश्वास ठेवल्याने तुम्हाला श्रेय मिळणार नाही अशी चिन्हे आहेत.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)