Saturn Transit Kumbh Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता कर्म फळ देणारा शनिदेवांनी कुंभ राशीत गोचर केलं असून आता ते ० अंशावरून ३० अंशापर्यंत जाणार आहेत. त्यामुळे जवळपास ते अडीच वर्ष कुंभ राशीत गोचर करण्याची शक्यता आहे. याशिवाय शनिदेव या अवस्थेत राशीनुसार पाय पण बदलतात. ज्यामुळे काही राशींमध्ये ते सोने, तांबे, चांदी आणि लोखंडाच्या पाऊलांनी प्रवेश करतात अशी मान्यता आहे. राशीचक्रामधील अशा ३ राशी अशा आहेत, ज्या राशीमध्ये शनिदेव चांदीच्या पाऊलांनी प्रवेश करणार आहेत आणि ज्यामुळे त्या राशींना धनप्राप्ती आणि प्रगतीचा योग होण्याची शक्यता आहे. त्या राशींबद्दल जाणून घेऊया.

मकर राशी –

शनिदेव मकर राशीतून चांदीच्या पाऊलांनी गोचर करत आहेत. त्यामुळे या राशीतील लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्याता आहे. याशिवाय या राशीतील लोकांच्या आरोग्यही सुधारण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, शनिदेव तुमच्या गोचर कुंडलीच्या दुसर्‍या स्थानात गोचर करत आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसंच शनिदेव शेवटच्या अंशात येणार असल्याने तुमचे उत्पन्न वाढू शकते आणि तुम्ही मालमत्ता खरेदी करू शकता.

तूळ राशी –

हेही वाचा- ३० वर्षांनी शनिच्या राशीत राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील श्रीमंत? धनलाभ व प्रतिष्ठेची मोठी संधी

या राशीतील लोकांवरचा शनिच्या ढय्याचा प्रभाव १७ जानेवारीपासून दूर झाला आहे. शनिदेव या राशीतून चांदीच्या पाऊलांनी प्रवेश करत आहे. त्यामुळे जे डॉक्टर, इंजिनिअरिंग आणि सरकारी नोकरीची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ चांगला ठरू शकतो. या काळात तुमची मोठ्या लोकांशी ओळख होऊ शकते. प्रेमप्रकरण आणि वैवाहिक जीवनात तणावाची परिस्थिती असू शकते. कारण, राहु देव तुमच्या राशीपासून सातव्या स्थानावर आहेत. त्यामुळे वादविवाद शक्यतो टाळा.

मिथुन राशी –

मिथुन राशीतही शनिदेव चांदीच्या पाऊलांनी प्रवेश करत आहेत. यासोबतच शनिदेव या राशीच्या गोचर कुंडलीच्या भाग्य स्थानात आहेत. ज्यामुळे तुम्ही नशीबवान ठरू शकता. तसंच तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडे जास्त कष्ट सहन करावे लागू शकतात. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता असून राजकारणाशी संबंधित लोकांना काही महत्त्वाची पदे मिळू शकतात तसेच मान-सन्मान वाढण्याचीही शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील लेख माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)