Shani Uday 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायदेवता शनी हा सर्वांत शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो. कारण- तो एकमेव ग्रह असा आहे, जो प्रत्येक राशीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो, या ग्रहाकडेच साडेसाती आणि धैर्याचा अधिकार आहे. सध्या शनी देव कुंभ राशीत अस्त स्थितीत आहे. अशात ६ एप्रिल रोजी शनीचा मीन राशीत उदय होईल. शनीचा मीन राशीतील उदय अनेक राशींच्या जीवनात आनंद, सुख, भरभराट घेऊन येऊ शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्यायदेवता शनी ६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी मीन राशीत उदय करेल. पण, नेमक्या कोणत्या राशींना शनीच्या उदयामुळे फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊ…

वृश्चिक (Scorpio)

शनीचा मीन राशीतील प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते आणि त्याचबरोबर मोठ्या आर्थिक लाभाचीही संधीही मिळू शकते. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. काही आनंददायी क्षण तुमच्या आयुष्याचे दार ठोठावू शकतात. तुम्हाला तुमच्या मुलांबरोबर चांगला आनंदी वेळ घालवता येईल. कुटुंबाबरोबरही तुमचा वेळ चांगला जाईल. या काळात आर्थिक गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. जीवनात फक्त आनंद येऊ शकतो.

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. या राशीच्या लोकांच्या संवादकौशल्यात वाढ होणार आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तींना खूप आनंद मिळू शकतो. प्रेमी जीवनदेखील चांगले राहणार आहे. आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो, समाजातही आदर वाढेल. तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकता. तुमचे तुमची लहान भावंडे आणि जवळच्या मित्र यांच्याशी चांगले संबंध असतील आणि तुम्हाला त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळू शकेल. आर्थिक परिस्थिती चांगली असू शकते. तुमचे सर्व लक्ष मालमत्ता वाढवण्यावर आणि संपत्ती जमा करण्यावर असेल. त्यामुळे नात्यांमध्ये सुरू असलेल्या समस्या संपू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तूळ (Libra)

शनीचा उदय तूळ राशीच्या लोकांसाठीही फलदायी ठरू शकतो. या काळात तूळ राशीच्या लोकांना काही फायदे मिळू शकतात. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बरेच फायदे मिळू शकतात. शनीच्या कृपेने एकाग्रता वाढू शकते. तुमच्या आयुष्यातील अनिश्चितता आणि अनेक समस्या हळूहळू कमी होऊ शकतात. कुटुंबाची संयुक्त मालमत्ता वाढवू शकते. त्यासह संवाद कौशल्येदेखील सुधारू शकतात. धैर्य आणि दृढनिश्चय वेगाने वाढू शकतो. तुम्ही तुमच्या भावा-बहिणींबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. आरोग्याकडे थोडे लक्ष देण्याची गरज आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्य हळूहळू सुधारू शकते.