Shani Vakri and Guru Uday: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा १२ राशींच्या व्यक्तींवर विशेष प्रभाव पाहायला मिळतो. जुलै महिन्यात शनी वक्री अवस्थेत जाणार असून गुरू उदित अवस्थेत जाणार आहे. ज्याचा काही राशींच्या व्यक्तींवर चांगला परिणाम पाहायला मिळेल.
‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींना शनी आणि गुरूच्या बदलणाऱ्या स्थितीची शुभ प्रभाव पाहायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
मिथुन (Mithun Rashi)
शनी-गुरूच्या बदलणाऱ्या स्थितीचा मिथुन राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी संधी मिळेल.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींवरही शनी-गुरूच्या बदलणाऱ्या स्थितीचा सकारात्मक प्रभाव पडेल.हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)