Shani Vakri Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी एका राशी किंवा नक्षत्रातून दुसऱ्या राशी, नक्षत्रात वक्री गोचर करीत असतो, ज्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम प्रत्येक राशीवर दिसून येतो. त्यात शनी देव जुलैमध्ये वक्री होणार आहे; तर गुरू १४ मे रोजी मिथुन राशीत प्रवेश करील.नंतर पाच महिन्यांनी म्हणजे १८ ऑक्टोबर रोजी तो कर्क राशीत प्रवेश करील. अशा परिस्थितीत शनि वक्री आणि गुरू गोचर स्थिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशींना अचानक आर्थिक लाभ आणि मान, पद, प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. तर, चला जाणून घेऊ या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मिथुन

शनीची वक्री गती आणि गुरूचे गोचर मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तसेच, तुमची काम करण्याची पद्धत सुधारेल. तुम्हाला देश किंवा परदेशांत प्रवासाची संधी मिळेल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. मालमत्तेतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, कौटुंबिक वाद मिटू शकतात.

वृषभ

शनी देवाची वक्री चाल आणि गुरूचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक प्रभावित होतील. व्यवसायात अचानक मोठा नफा होऊ शकतो. त्याचबरोबर सरकारी कामात यश आणि पद व प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. तसेच, यावेळी तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.

मीन

मीन राशीच्या लोकांसाठी गुरूचे गोचर आणि शनीचे वक्री होणे शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मानसिक शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. हा काळ वाहने आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी सर्वांत उत्तम आहे.