Dainik Rashi Bhavishya In Marathi 22 September 2025 : आज २२ सप्टेंबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असणार आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी २२ सप्टेंबर (सोमवार) रोजी मध्यरात्री ०१ वाजून २३ मिनिटांपासून सुरू होईल आणि २३ सप्टेंबर (मंगळवारी) रोजी २ वाजून ५५ मिनिटांनी समाप्त होईल. आज शुक्ल योग जुळून येईल आणि उत्तराफाल्गुनी नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असेल आणि आज राहू काळ ७ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल ते ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत असणार आहे. उद्या सूर्य आणि चंद्र दोघेही कन्या राशीत असतील. तर आज पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री तुमच्या राशीला कसा आशीर्वाद देऊन जाणार जाणून घेऊया…

२२ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Today Horoscope In Marathi 22 September 2025 )

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

आत्मविश्वास बाळगून काम करा. नातेवाईकांशी व्यवहाराने वागा. आज दिनक्रम व्यस्त राहील. मनाचा तोल सांभाळावा. समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

इतरांकडून स्तुति केली जाईल. सतत काम करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगा. ग्रहमानाची साथ मिळेल. आजचा दिवस शुभ राहील. धनसंचय वाढीस लागेल.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

वागणे आणि बोलणे यांचा मेळ साधावा. दिवस धावपळीत जाईल. मात्र नियोजित काम पूर्ण होईल असे नाही. प्रवास संभवतो. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे. घरातील कामात अडकून पडाल. रचनात्मक कामात आनंद मिळेल. व्यक्तिमत्व विकास वृद्धिंगत होईल. मानसिक शांतता व प्रसन्नता लाभेल.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

आपल्या चांगुलपणाला तडा जाऊ देऊ नका. मनातील इच्छेला अधिक महत्व द्यावे. कार्यक्षेत्रात उत्तम कामकाज कराल. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. प्रामाणिकपणे काम करण्यावर भर द्याल.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

आळस बाजूला सारावा लागेल. आपल्यातील कला जोपासा. कामाचा अधिक ताण जाणवेल. धार्मिक गोष्टीत मन रमेल. वादाचे प्रसंग टाळावेत.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

हातातील काम मनापासून करावे. कामातून चांगले समाधान मिळेल. आपण घेत असलेल्या मेहनतीला योग्य फळ मिळेल. आनंदाची अनुभूति घ्याल. मित्राचा सल्ला मोलाचा ठरेल.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

आहारातील पथ्य पाळा. अंत:करणापासून समोरच्याला मदत करा. प्रेम संबंधातील ओलावा वाढेल. नातेवाईक मदतीला येतील. जुने मित्र बरेच दिवसांनी भेटण्याचा योग.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

आज आखलेले काम सुरळीत पार पडेल. जास्त काळजी करू नये. स्पर्धा परीक्षेसंदर्भात सकारात्मक वार्ता मिळेल. मित्राने दिलेली शुभ वार्ता मन प्रसन्न करेल. समस्येचे निराकरण होईल.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

उगाचच कोणाची खोडी काढू नका. कामाचा व्याप वाढता राहील. जवळचा प्रवास करावा लागेल. कामाच्या बाबतीत गाफिल राहू नका. विस्कळीत कामाची घडी नीट बसवावी.

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

फसव्या लोकांपासून सावध रहा. स्वत:च्या जबाबदारीवर निर्णय घ्या. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. मित्राची योग्य साथ लाभेल. विरोधक पराभूत होतील.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

व्यावसायिक प्रगती साधता येईल. मनोकामना पूर्ण करणारा दिवस. अति तिखट पदार्थ खाणे टाळावे. धार्मिक कामातील गोडी वाढेल. कुटुंबासाठी देखील वेळ काढावा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर