Kendra Trikona Rajyog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात, शनी हा सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानला जातो, कारण तो प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. यात हा सर्वात संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो, जो एका राशीत सुमारे अडीच वर्षे भ्रमण करतो. यामुळे त्याला एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनी मीन राशीत स्थित आहे, पण १३ जुलै रोजी शनी मीन राशीत वक्री होणार आहे. शनीच्या वक्रीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण होईल, ज्यामुळे काही राशींना भरपूर लाभ मिळू शकतो.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, केंद्र त्रिकोण राजयोग हा सर्वात शुभ योगांपैकी एक मानला जातो. या योगाच्या निर्मितीमुळे काही राशींच्या लोकांना धन, समृद्धी, कीर्ती आणि सन्मानदेखील मिळतो.
वृश्चिक
शनीच्या केंद्र-त्रिकोण राजयोगाने वृश्चिक राशीच्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. या काळात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतात. तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे पूर्ण फळ मिळेल. लग्न करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. लग्नाची बोलणी पक्की होऊ शकतात. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर तुम्ही खूप व्यस्त राहणार आहात. घर आणि कुटुंबासाठी नक्कीच वेळ काढा. सोशल नेटवर्किंगमधून फायदा होईल. कोणतीही जुनी इच्छा, विशेषतः जमीन, इमारतीशी संबंधित इच्छा पूर्ण होऊ शकते. याशिवाय बांधकाम, वाहन खरेदी किंवा कोणतीही मोठी गुंतवणूक करू शकता.
धनु
धनु राशीच्या लोकांना शनीचा केंद्र त्रिकोण राजयोग सकारात्मक ठरू शकतो. या काळात तुमचे घर, फ्लॅट किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. हा काळ गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा व्यवसाय कर्ज घेण्यासाठीदेखील अनुकूल आहे. कुटुंबातील वाद आता मिटू शकतात. आईच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांना लग्नासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. व्यवसायात, विशेषतः भागीदारी व्यवसायात, मंदी किंवा अनिश्चितता होती ती संपेल आणि नफा होईल. लक्ष केंद्रित करण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची तुमची क्षमता वाढेल, ज्याचा तुम्हाला अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. तुम्ही पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता. तुम्ही कोणत्याही जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकता.