31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya : आज ३१ ऑगस्ट २०२४ रोजी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असणार आहे. त्रयोदशी तिथी रात्री ३ वाजून ४२ मिनिटांपर्यंत राहील. तसेच शनिवारी पुष्य नक्षत्र ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत राहील. आज राहू काळ पहाटे ९ वाजता सुरु होईल ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल.

तसेच आज पाचवा म्हणजेच शेवटचा श्रावणी शनिवार सुद्धा असणार आहे. शेवटच्या श्रावणी शनिवारी शनिप्रदोष व्रत आहे. शनिप्रदोष व्रतात शनिदेव व महादेवाची पूजा केली जाते. तर मेष ते मीन राशींचा महिन्याचा शेवटचा दिवस कसा असेल? कोणाचा दिवस असेल आनंदी तर कोणाचा काळजीचा हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊ या…

३१ ऑगस्ट पंचांग व राशीभविष्य :

मेष:- काही गोष्टींबाबत फारच आग्रही राहाल. परिस्थिती अनुरूप विचार करावा. व्यवहार चातुर्य दाखवावे लागेल. धार्मिक कामातून मान मिळवाल. स्वत:बद्दलच्या चुकीच्या कल्पना मनातून काढून टाका.

वृषभ:- नवीन विचारांची कास धरावी. अती कर्मठपणे वागू नये. वडीलधार्‍या व्यक्तींचा मान राखावा. अती श्रमाचा थकवा जाणवेल. बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रगती करता येईल.

मिथुन:- प्रतिकूलतेतून मार्ग काढावा लागेल. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. फसव्या लोकांपासून सावध राहावे. काही क्षणिक गोष्टींचा लाभ होईल.

कर्क:- भागीदारीच्या व्यवसायात संयम बाळगावा लागेल. जोडीदाराच्या शांत स्वभावाचे कौतुक कराल. हातापायाला किरकोळ इजा संभवते. मनातील इच्छा मोकळेपणाने बोलून दाखवावी. अती विचार करण्यात वेळ वाया जाईल.

सिंह:- लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. वाट विकार बळावू शकतात. क्षुल्लक गोष्टींवरून मनस्तापाची शक्यता. कष्टाशिवाय पर्याय नाही. वादाच्या मुद्द्यांपासून दूर राहावे.

कन्या:- इतरांचा विश्वास संपादन करावा. अती व्यवहारी वागून चालणार नाही. चिकाटीने कामे तडीस न्याल. वरिष्ठांची नाराजी दूर करावी लागेल. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल.

तूळ:- स्थावरची कामे मार्गी लागतील. बर्‍याच दिवसांपासून रखडलेली कामे सुरू होतील. व्यवसायाच्या दृष्टीने काही नवीन योजना अंमलात आणाल. उत्तम गृहसौख्य लाभेल. मुलांचे स्वतंत्र विचार समजून घ्या.

वृश्चिक:- कामानिमित्त प्रवास करावा लागेल. हातातील अधिकारात वाढ होईल. तुमच्यातील सुसंस्कृतपणा दिसून येईल. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. काही गोष्टीत तडजोड स्वीकारावी लागेल.

धनू:- इतरांच्या मदतीशिवाय कामे पूर्ण करावीत. वडिलोपार्जित कामांतून लाभ संभवतो. मोजकेच बोलण्यावर भर द्याल. आर्थिक बाबतीत विचारांती निर्णय घ्यावा. अती काटकसर करून चालणार नाही.

मकर:- चटकन निराश होऊ नका. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत चालढकल करू नका. अडथळ्यातून मार्ग निघेल. प्रौढपणे आपले विचार मांडावेत.

कुंभ:- मानापमानाचे प्रसंग फार मनावर घेऊ नका. घराबाहेर वावरतांना सावध राहा. हित शत्रूंकडे लक्ष ठेवावे लागेल. आर्थिक गुंतवणूक तूर्तास टाळावी. क्षुल्लक गोष्टींवरून चिडचिड वाढू शकते.

मीन:- मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. सामाजिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. तुमच्यातील कलेला चांगली दाद मिळेल. चार-चौघांत तुमचा दर्जा वाढेल. व्यवसायातून चांगला आर्थिक लाभ होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर