Guru Shukra Uday 2024: ज्योतिष शास्त्रात ग्रहांना अत्यंत मानाचं स्थान दिलं गेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी उदय होतात आणि मावळतात आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. शुक्र हा ग्रह सर्व ग्रहांमध्ये सर्वात तेजस्वी ग्रह मानला जातो. शुक्र ग्रह हा आनंद, विलास आणि ऐश्वर्य यांचा कारक आहे. तर दुसरीकडे वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरु गुरु हा जीवनाचा कारक आणि शुभ ग्रह मानला जातो. ज्योतिष शास्त्रात गुरुचे संक्रमण खूप महत्वाचे आहे. आता जूनमध्ये देवगुरु आणि भौतिक सुखांचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. त्यामुळे काही राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. गुरू आणि शुक्राच्या कृपेने कोणत्या राशींचे भाग्य उजळेल ते जाणून घेऊयात.

‘या’ राशींना होणार अपार धनलाभ?

वृषभ राशी

शुक्र आणि देवगुरुच्या उदयाने वृषभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. या दरम्यान कामांमध्ये चांगली प्रगती दिसून येऊ शकते आणि रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. नोकरदारवर्गाला करिअरच्या दृष्टीने नव्या संधी मिळू शकतात. तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे लाभू शकतात. जुनाट आजारांपासून मुक्ती मिळू शकते. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यापारात आपली प्रतिमा उंचावू शकते. उत्पन्नाचं नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे. सुख-समृद्धी वाढू शकते. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. घरातील वातावरण प्रसन्न असू शकतो.

(हे ही वाचा : ३१ मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? बुधदेव राशी बदल करताच अचानक होऊ शकते संपत्तीत वाढ)

कर्क राशी

शुक्र आणि देवगुरुच्या उदयाने कर्क राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळू शकतो. तुम्हाला अनेक मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. या काळात नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती तुम्हाला आनंद देऊ शकते. नोकरदारांना आर्थिक फायदा होऊ शकतो. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. या काळात तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता. तुम्हाला अनपेक्षित पैसा मिळू शकतो. अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. गुंतवणुकीतून या लोकांना धनलाभ होऊ शकतो. भौतिक सुखात वाढ होऊ शकते.

सिंह राशी

शुक्र आणि देवगुरुच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना संपत्ती आणि मालमत्तेशी संबंधित सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांना दुप्पटीने नफा प्राप्त होऊ शकतो. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊन पैशांची समस्या दूर होऊ शकते. तुमची आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहू शकते. करिअरमध्ये यश आणि आर्थिक लाभ यामुळे या लोकांच्या घरात आनंदच आनंद राहू शकतो. धनलाभामुळे यांचं बँक बॅलेन्स मजूबत होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)