Shukra Arun Ardhakendra Yog 2025: वैदिक ज्योतिषानुसार, धन देणारा ग्रह शुक्र काही काळानंतर आपली रास बदलतो आणि त्यामुळे त्याच्या स्थितीत बदल होतो. याचा परिणाम देश-विदेशात दिसून येतो. सध्या शुक्र मिथुन राशीत आहे. १४ ऑगस्टला शुक्र आणि अरुण एकत्र येऊन अर्धकेंद्र योग तयार करत आहेत. यामुळे काही राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊ या त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

वैदिक ज्योतिषानुसार, १४ ऑगस्टला सकाळी ७ वाजून २२ मिनिटांनी शुक्र आणि अरुण हे एकमेकांपासून ४५ अंशावर असतील, ज्यामुळे अर्धकेंद्र योग तयार होईल.

कन्या राशी (Virgo Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र- अरुणचा अर्धकेंद्र योग फायदेशीर ठरू शकतो. या लोकांना त्यांच्या मेहनतीचं फळ मिळू शकतं. या राशीत अरुण भाग्य भावात आणि शुक्र दशम भावात आहे. त्यामुळे मेहनतीनुसार नशीब साथ देऊ शकतं. नोकरी करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. नवीन संधी मिळण्याचे योग आहेत. धर्म-कर्माच्या गोष्टींमध्येही लाभ होऊ शकतो. तुम्ही तीर्थयात्रेला जाऊ शकता. उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. नोकरीत प्रगतीचे योग आहेत. पण विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नका, नाहीतर पुढे अडचण येऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते.

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)

या राशीच्या लोकांसाठी शुक्र- अरुणचा अर्धकेंद्र योग खूप फायदेशीर ठरू शकतो. खूप दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होऊ शकतात. कुटुंबासोबत छान वेळ घालवता येईल. आर्थिक बाबतीत लाभ मिळण्याची शक्यता आहे. जुनी आजारपणं बरी होऊ शकतात. प्रेमसंबंध चांगले राहतील. जोडीदारासोबत छान वेळ जाईल. तसेच जीवनात आनंद येऊ शकतो.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

या राशीच्या लोकांसाठीही अर्धकेंद्र योग अनुकूल राहणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना विविध क्षेत्रांत फायदा होऊ शकतो. लाभेश गुरुसोबत युती होत असल्याने जास्त लाभ मिळण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित समस्या संपुष्टात येऊ शकतात. कुटुंबासोबत छान वेळ घालवता येईल. जीवनात आनंद येऊ शकतो. जोडीदारासोबतचा संबंध मजबूत होऊ शकतो. आर्थिक दृष्टिकोनातूनही ही वेळ चांगली राहणार आहे.