दशांक योग २०२५: ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांपैकी एक असलेल्या शुक्र ग्रहाला संपत्ती, विवाह, आनंद, समृद्धी, प्रेम जीवन, सन्मान आणि आदर यांचा कारक मानले जाते. तसंच एका विशिष्ट कालावधीनंतर त्याचे राशी चिन्हही बदलते. शुक्र एका राशीत सुमारे २६ दिवस राहतो. म्हणूनच त्याच राशीत परत येण्यासाठी अंदाजे १२ महिन्यांचा कालावधी लागतो. सध्या शुक्र सूर्याच्या राशीत, सिंह राशीत आहे आणि ९ ऑक्टोबरपर्यंत तिथेच राहील. तो एका किंवा दुसऱ्या ग्रहाच्या दृष्टीत राहील. त्यामुळे विशेष योग निर्माण होऊ शकतात. त्याचप्रमाणे शुक्र लवकरच बुधाशी संयोग करून दशांक योग तयार करेल. हा योग १२ राशींच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम करेल हे निश्चित आहे. मात्र, त्यापैकी कोणत्या राशी भाग्यवान असतील त्या राशींबाबत जाणून घेऊ…

वैदिक कॅलेंडरनुसार, २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी बुध आणि शुक्र हे ३६ अंश अंतरावर असतील. त्यामुळे दशांक योग निर्माण होईल. यावेळी बुध कन्या राशीत असेल. ग्रहांचा राजकुमार बुध आणि राक्षसांचा गुरू शुक्र यांच्यातील ही युती काही राशींना विशेष लाभ देऊ शकते.

सिंह राशी

या राशीच्या लोकांसाठी बुध-शुक्र दशांकाची युती अनेक क्षेत्रांमध्ये लाभदायक ठरू शकते. सध्या शुक्र लग्नाच्या घरात आहे आणि बुध दुसऱ्या घरात आहे. त्यामुळे सिंह राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये अनुकूल परिणाम मिळू शकतात. नोकरीत लक्षणीय फायदा होऊ शकतो. बेरोजगार व्यक्तींना नोकरी मिळू शकते. शिवाय तुमच्या कामात काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. तुमची व्यवसाय रणनीती प्रभावी ठरू शकते. तुम्हाला अनेक नवीन ऑर्डर किंवा प्रकल्प मिळू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल आणि तुम्हाला कर्जातूनही मुक्तता मिळू शकते. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तसंच तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेले संघर्ष संपू शकतात. काही आरोग्यविषयक चिंतादेखील कमी होऊ शकतात.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांनाही अनेक क्षेत्रात फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत सुरू असलेले त्यांचे संघर्ष संपुष्टात येऊ शकतात. या काळात जलद प्रगती शक्य आहे. तसंच अनेक क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळू शकते. तुम्हाला कामासाठी वारंवार प्रवास करावा लागू शकतो. मात्र, या प्रवासामुळे लक्षणीय फायदेही मिळू शकतात. व्यवसायाच्या संधी अनुकूल असू शकतात. तुमची आर्थिक परिस्थिती देखील चांगली असेल, उत्पन्नाची नवीन दारं खुली होतील. तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवू शकता.

वृश्चिक राशी

या राशीच्या लोकांसाठी दशांक योग अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. त्यांना त्यांच्या मित्रांकडून आणि हितचिंतकांकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो. त्यामुळे ते त्यांचे ध्येय साध्य करू शकतात. तसंच कौटुंबिक मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एक नवीन आणि उत्कृष्ट करिअर संधीही मिळू शकते. परदेशात नोकरी शोधणाऱ्यांनाही फायदा होऊ शकतो. व्यवसायातही नफा होण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या स्पर्धकांना जोमाची टक्कर देऊ शकता. तुम्हाला लक्षणीय आर्थिक लाभदेखील मिळू शकेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही ऊर्जेने परिपूर्ण असाल.