Venus Planet Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. सध्या शुक्र मीन राशीत विराजमान असून तो ३१ मे रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या मेष राशीतील प्रवेशाने काही राशींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.

पंचांगानुसार, शुक्र ३१ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजून ४२ मिनिटांनी शुक्र मंगळ ग्रहाच्या मेष राशीत प्रवेश करेल तो २९ जूनपर्यंत या राशीत विराजमान असेल. ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.

शुक्र ‘या’ तीन राशींना करणार मालामाल

मिथुन (Gemini)

शुक्र मेष राशीत प्रवेश करून मिथुन राशीच्या अकराव्या घरामध्ये विराजमान होईल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. करिअरमध्ये प्रगती होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. जोडीदारबरोबर सुखाचे क्षण व्यतीत कराल.

सिंह (Leo)

शुक्राचे राशी परिवर्तन सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या राशीच्या शुक्र दहाव्या घरात विराजमान असेल. या काळात सिंह राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. जोडीदाराची साथ मिळेल आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. आकस्मिक धनलाभ होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

कुंभ (Aquarius)

शुक्राचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना सकरात्मक फळ देईल. या राशीच्या शुक्र तिसऱ्या घरात विराजमान असेल. तुम्हाला अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील.

(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.