Shukra Gochar 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिष्यशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठरावीक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतो. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम होत असतो. शुक्र ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक महिना लागतो. आता शुक्र ग्रह जून महिन्यात गोचर करणार आहेत. धन आणि समृद्धीचा कर्ता शुक्र जूनच्या अखेरीस म्हणजेच २९ जून रोजी मेष राशी सोडून स्वतःच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र स्वतःच्या राशीत अनेक पटींनी अधिक शक्तिशाली बनतो. अशा परिस्थितीत काही राशींच्या लोकांना या संक्रमणाचा भरपूर फायदा होऊ शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित काम पूर्ण झाल्याने नोकरी-व्यवसायावर सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. चला जाणून घेऊ ज्या राशींचे लोक भाग्यवान ठरणार आहेत, त्या राशींबद्दल…
‘या’ राशींचे सुखाचे दिवस होणार सुरु?
कर्क
शुक्र गोचरमुळे कर्क राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होऊ शकतात. या काळात तुमच्या व्यवसायातून तुम्हाला याचा चांगला लाभ मिळू शकतो. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी चांगली स्थिती राहू शकते. नवीन कामाची सुरुवात करण्याची संधी मिळू शकते. काही जातकांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. यासोबतच आर्थिक स्थितीही सुधारु शकते. समाजात मान-सन्मान मिळू शकतो.
कन्या
शुक्र गोचरमुळे कन्या राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. घरात कोणतेही शुभ किंवा धार्मिक कार्य होऊ शकते. नोकरदार व्यक्तींसाठी हा कालावधी शुभ ठरु शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळू शकतात. विकासाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्णकाळ म्हणता येईल. कारण- या काळात तुम्हाला पदोन्नतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. भौतिक सुख लाभू शकतो. कामाच्या निमित्ताने परदेश प्रवास करावा लागू शकतो.
कुंभ
शुक्र गोचरमुळे कुंभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस येऊ शकतात. या कालावधीत परदेश प्रवासाची संधी मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळू शकते. दीर्घकाळापासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. ज्या व्यक्ती नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना नवीन संधी मिळू शकतात. मुलांकडून एखादी चांगली बातमी येऊ शकते. तसेच यावेळी तुम्हाला परदेशातून चांगले पैसे मिळू शकतात. या काळात तुम्हाला वाहनखरेदीचा आनंदही मिळू शकेल. यावेळी तुम्हाला प्रेम प्रकरणात यश मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)