Shukra Gochar Impact on Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला वैभव, संपत्ती, पैसा, भौतिक सुख, ऐशोआराम, आकर्षण आणि दांपत्य सुख यांचा कारक मानले जाते. त्यामुळे जेव्हा शुक्र ग्रहाच्या गतीत बदल होतो, तेव्हा या गोष्टींवर विशेष परिणाम होतो.
डिसेंबर महिन्यात शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहेत. याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल. पण अशा तीन राशी आहेत ज्यांचे या काळात नशीब बदलू शकते. तसेच या काळात तुम्हाला पद आणि मान-सन्मान मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया या लकी राशी कोणत्या आहेत…
मेष राशी (Aries Horoscope)
शुक्र ग्रहाचा राशी बदल धनु राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या कुंडलीतील नवव्या भावातून प्रवास करतील. त्यामुळे या काळात तुम्हाला नशिबाचा साथ मिळू शकतो. अडकलेले काम पूर्ण होऊ शकतात. तुम्ही धर्म आणि सत्कर्मासाठी खर्च करू शकता. तसेच काम किंवा व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास होऊ शकतो. बराच काळ थांबलेली कामे आता पूर्ण होतील. नवीन योजना किंवा गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे. व्यवसायात वाढ आणि नफा मिळण्याची संधी मिळेल. समाजात तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
तुमच्यासाठी शुक्र ग्रहाचा राशी बदल फायदेशीर ठरू शकतो. कारण शुक्र देव तुमच्या कुंडलीतील पहिल्या भावातून प्रवास करतील. त्यामुळे या काळात तुमच्या काम करण्याच्या पद्धतीत सुधारणा दिसेल. तुमचं वैयक्तिक जीवनही या काळात चांगलं राहील. जीवनसाथीकडून पूर्ण साथ मिळेल. नवीन घर किंवा वाहन मिळण्याची शक्यता आहे. घरगुती जीवनात आनंद आणि समाधान राहील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग बनतील. उत्पन्नात वाढ होईल आणि मुलांबद्दल समाधान मिळेल. ज्यांना बराच काळ नोकरीची प्रतीक्षा आहे, त्यांनाही या काळात चांगली संधी मिळू शकते.
मीन राशी (Pisces Horoscope)
शुक्र ग्रहाचा गोचर मीन राशीच्या लोकांसाठी करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने शुभ ठरू शकतो. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीपासून कर्म भावात प्रवास करतील. त्यामुळे या काळात तुम्हाला कामात आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. व्यावसायिक लोकांना व्यापारात नफा होण्याची शक्यता आहे आणि मोठा करार मिळू शकतो. जुन्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच वरिष्ठ आणि सहकाऱ्यांचा पूर्ण सहयोग मिळेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
