Shukra Gochar: वैदिक ज्योतिषानुसार ग्रह कधी कधी महिन्यात नक्षत्रासोबत राशी बदलतात. याचा परिणाम माणसाच्या जीवनावर तसेच देश-विदेशावर दिसतो. ऑक्टोबर महिन्यात शुक्र ग्रह ४ वेळा आपली चाल बदलणार आहेत.

६ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्रदेव उत्तराफाल्गुनी नक्षत्रात प्रवेश करतील. त्यानंतर ९ ऑक्टोबरला ते कन्या राशीत जातील आणि तिथे पूर्ण महिना राहतील. यामध्ये १७ ऑक्टोबरला शुक्र हस्त नक्षत्रात जातील आणि मग २८ ऑक्टोबरला चित्रा नक्षत्रात प्रवेश करतील.

यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. उत्पन्न वाढण्याची आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊ या कोणत्या भाग्यवान राशी आहेत…

मेष राशी (Aries Horoscope)

शुक्र ग्रहाच्या ४ वेळा होणाऱ्या चाल बदलामुळे मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते आणि कमाईचे नवे मार्ग तयार होऊ शकतात. तुम्ही या काळात बऱ्याच प्रवासाला जाल आणि ते प्रवास फायद्याचे ठरतील. कुटुंबासोबतचे संबंध सुधारतील. कुटुंबासोबत लांब पल्ल्याचा प्रवास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवी जबाबदारी मिळू शकते. तसेच कार्यस्थळी ज्युनियर आणि सिनियर दोघांचा पाठिंबा मिळेल.

धनु राशी (Sagittarius Horoscope)

तुमच्यासाठी शुक्र ग्रहाच्या ४ वेळा होणाऱ्या चाल बदलामुळे चांगले परिणाम मिळू शकतात. या काळात तुमची कमाई खूप चांगली होईल आणि नातेसंबंधही मजबूत होतील. तुम्ही या काळात देश-विदेश प्रवास करू शकता. तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. जे लोक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी येणारा काळ फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील. तसेच तुम्हाला शेअर बाजार, सट्टा किंवा लॉटरीतूनही फायदा होऊ शकतो.

कुंभ राशी (Aquarius Horoscope)

तुमच्यासाठी शुक्र ग्रहाच्या ४ वेळा होणाऱ्या चाल बदलामुळे फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीकडे वरिष्ठांचे लक्ष जाईल आणि ते तुमच्या प्रयत्नांची दखल घेतील व कौतुक करतील. या काळात तुम्ही करिअर आणि कौटुंबिक जीवनात समाधानी दिसाल. तरुणांसाठी उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग सोपा होईल आणि समाजात नवी ओळख मिळेल. तसेच या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तयार होऊ शकतात.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)