Shukra Gochar: वैदिक ज्योतिषात शुक्र हा एक शक्तिशाली ग्रह मानला जातो. पैसा, संपत्ती, ऐशोआराम, प्रेम आणि आकर्षण यांचा कारक म्हणजे शुक्र. काही काळानंतर तो आपली रास आणि नक्षत्र बदलतो. याचा परिणाम बारा राशींवर वेगवेगळ्या प्रकारे दिसतो. सध्या शुक्र कर्क राशीत आहे आणि आज तो आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे.

दैत्यांचा गुरु शुक्र जेव्हा बुधाच्या नक्षत्रात जातो तेव्हा त्याचा प्रभाव बारा राशींवर होतो. यामध्ये ३ राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. चला तर मग, त्या भाग्यवान राशी कोणत्या ते जाणून घेऊया.

वैदिक पंचांगानुसार शुक्र ३ सप्टेंबर रोजी म्हणजे आज रात्री ११ वाजून ५७ मिनिटांनी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. आकाशातील २७ नक्षत्रांपैकी आश्लेषा हे ९वे नक्षत्र आहे आणि त्याचा स्वामी ग्रह बुध आहे.

मिथुन राशी (Gemini Horoscope)

या राशीत शुक्र आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करून दुसऱ्या भावात बसणार आहे. या राशीचा पाचवा आणि बारावा भावाचा स्वामी देखील शुक्रच आहे. त्यामुळे या गोचराचा चांगला परिणाम दिसेल. या काळात नशीब तुमच्या सोबत असेल. कामानिमित्त अनेक प्रवास करावे लागतील आणि त्यातून पैशाचे लाभ होतील. करिअरच्या दृष्टीने हा काळ खूप चांगला असेल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीनुसार बढती आणि मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यापाऱ्यांसाठीही हा गोचर फायद्याचा ठरेल आणि नफा वाढेल. धैर्य आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे अनेक क्षेत्रांत यश मिळेल. पैशांच्या बाबतीतही हा काळ शुभ असेल. लग्नात गोडवा राहील आणि प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्यांना कुटुंबाची संमती मिळू शकते. आरोग्याच्या दृष्टीने देखील हा काळ चांगला असेल.

कर्क राशी (Cancer Horoscope)

आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करून शुक्र लग्न भावात बसतील. त्यामुळे या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांत फायदा होण्याची शक्यता आहे. नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि बराच काळ अडकलेली कामे आता पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल आणि कुटुंबासोबत छान वेळ घालवाल. करिअरच्या दृष्टीने हा काळ प्रवासांनी भरलेला असेल, जे तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत करतील. व्यापाऱ्यांसाठीही हा गोचर खूप फायद्याचा ठरेल आणि तुम्ही तुमच्या स्पर्धकांना जोरदार टक्कर द्याल. वैवाहिक जीवन सुखकर राहील. आरोग्यही चांगले राहील.

कन्या राशी (Virgo Horoscope)

या राशीत शुक्र आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करून ११व्या भावात बसतील, जे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात नशीब तुमच्या सोबत असेल आणि दीर्घकाळ अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्या क्षेत्रात हा काळ शुभ असेल. पदोन्नती, बोनस आणि चांगली कामगिरीची दखल मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि भविष्यासाठी बचत करता येईल. नातेसंबंधांच्या दृष्टीनेही हा काळ चांगला आहे. जीवनसाथीसोबत गोड नाते राहील आणि सहकार्य अधिक चांगले होईल. आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ उत्तम असेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)