वैदिक पंचांगानुसार शुक्र २४ तासांनंतर कर्क राशीत वक्री होणार आहे. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि सर्व राशींवर दिसून येईल. शुक्र हा धन, वैभव, ऐश्वर्य, भौतिक सुख, विलास आणि कामुकतेचा कारक मानला जातो. अशा स्थितीत शुक्र ग्रहाच्या हालचालीचा या क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. तसेच ३ राशी अशा आहेत, ज्यांना या काळात अचानक आर्थिक लाभ आणि करिअर व्यवसायात प्रगती होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राची वक्री चाल फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीत वक्री होणार आहे. तसेच, तो चतुर्थ आणि उत्पन्न स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला सर्व भौतिक सुखं मिळू शकतात. तसेच तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणाही दिसू शकते. या काळात तुम्ही वाहन इत्यादी खरेदी करू शकता. तुमच्या उत्पन्नातही वाढ होऊ शकते. शिवाय या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते.
तूळ रास (Tula Zodiac)
शुक्राची वक्री चाल तुळ राशीसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकते. कारण शुक्र तुमच्या राशीचा स्वामी आहे. तसेच, तो तुमच्या गोचर कुंडलीच्या कर्म स्थानी वक्री होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात चांगले यश मिळू शकते. यासोबतच कला-संगीताशी संबंधित लोकांना चांगली प्रसिद्धी आणि नफा मिळू शकतो. दुसरीकडे व्यापारी वर्गाला या काळात चांगली ऑर्डर मिळू शकते. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरु शकतो.
हेही वाचा- ७ ऑगस्टला गजकेसरी राजयोग बनताच ‘या’ राशींचे नशीब पालटणार? प्रचंड धनलाभासह व्यवसायात प्रगतीची शक्यता
मीन रास (Meen Zodiac)
शुक्राची वक्री चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी वक्री होणार आहे. तसेच, शुक्र तुमच्या राशीच्या तिसऱ्या आणि आठव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमच्या धैर्यात आणि शौर्यामध्ये वाढ होऊ शकते. त्याचबरोबर परदेशातूनही तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतात. तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्याच्या योग्य संधी मिळू शकतात. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तर प्रेम प्रकरणातही यश मिळू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)