Shukra Nakshatra Gochar 2024: शुक्र एका ठराविक कालावधीनंतर नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा परिणाम १२ राशींवर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यावेळी शु्क्र स्वाति नक्षत्र आणि तुळ राशीमध्ये विराजमान आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच ५ ऑक्टोबर रोजी नक्षत्र परिवर्तन करून विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. शुक्र त्याचा मित्र गुरूच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करत असल्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवतील. कुटुंबातील लोकांचे सहकार्य लाभेल. जीवनात भरपूर आनंद येईल. जाणून घ्या, शुक्र विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करत असल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

पंचानुसार शुक्र ५ ऑक्टोबर सकाळी १२ वाजून २० मिनिटांनी विशाखा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे आणि १६ ऑक्टोबर पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, एकुण २७ नक्षत्रामध्ये विशाखा हे १६ वे नक्षत्र आहे. या नक्षत्राचे स्वामी ग्रह गुरू आहे. या नक्षत्रामध्ये शुक्र ग्रह प्रवेश करत असल्यामुळे लोकांना सुख समृद्धी, संधी, नेतृत्व आणि आनंद मिळू शकतो.

ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा

मेष राशी (Mesh Zodiac)

या राशीच्या लोकांवर शुक्राची कृपा दिसून येते. या राशीच्या लोकांना त्यांचे मित्र, कुटुंब आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभणार. हे लोक काही ठिकाणी फिरायला जाऊ शकतात. करिअरचा विचार केला तर या लोकांमध्ये एक नवीन आशा निर्माण होईल. तसेच विदेशात नोकरी करण्याचे त्यांचे स्वप्न ते पूर्ण करू शकतात. या लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय क्षेत्रात लाभ मिळू शकतो. मल्टी लेव्हल मार्केटिंगच्या व्यवसायात सुद्धा या लोकांना लाभ मिळू शकतो. यांची आर्थिक स्थिती उत्तम राहीन. तुम्ही तुमच्या मित्राच्या मदतीने पैसा कमावू शकता. जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य लाभेल. तुमचे आरोग्य उत्तम राहीन.

हेही वाचा : Diwali 2024 : दिवाळीमध्ये निर्माण होईल शश राजयोग! ‘या’ राशीच्या लोकांवर होईल माता लक्ष्मीची कृपा, होईल पैशांचा पाऊस!

मिथुन राशी (Mithun Zodiac)

या राशीमध्ये पंचम स्थानावर शुक्र असणार आहे. अशात या राशीच्या लोकांना व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो. करिअर क्षेत्रात हे लोक प्रगती करतील. या लोकांच्या कामाचे कौतुक केले जाईल. या लोकांना पुरस्काराबरोबर मोठी जबाबदारी मिळू शकते. तसेच शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे लाभदायक ठरू शकते. जीवनात सुख समृद्धी आणि भरपूर आनंद लाभेल. जोडीदाराबरोबरचे संबंध दृढ होतील. हे लोक एकमेकांना वेळ देऊ शकतील.

सिंह राशी (Leo Zodiac)

या राशीमध्ये शुक्र तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना जीवनात भरपूर यश मिळू शकते आणि अपार धनलाभ होऊ शकतो.विदेशात नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. शुक्राबरोबर गुरूच्या कृपेमुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात यश आणि मान सन्मान मिळू शकतो. विदेशात व्यवसाय करण्याची संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती हळू हळू सुधारेल. कमावण्याचे नवीन मार्ग सापडतील. जोडीदाराबरोबरचे संबंध आणखी दृढ होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)