Shukra Rashi Parivartan 2025 Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. याचा प्रभाव सर्व राशींवर शुभ अशुभ स्वरूपात दिसून येऊ शकतो. काही राशींवर असणाऱ्या ग्रहांच्या स्वामित्वानुसार त्यांना नेमका कसा प्रभाव जाणवू शकतो याचे स्वरूप बदलू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन- वैभव, प्रेम- आकर्षण व सौंदर्य यांचा कारक मानला जातो. कुंडलीमध्ये शुक्र ग्रह उच्च किंवा लाभस्थानी असल्यास याचा प्रभाव अनेक राशींच्या प्रेमाच्या नात्यात, आर्थिक बाजूवर दिसून येऊ शकतो. आता येत्या ३१ मे ला शुक्रदेव गोचर करून मेष राशीत प्रवेश घेणार आहेत. शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे तीन राशींना येत्या काळात अमाप धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. या राशी नेमक्या कोणत्या व त्यांना कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया…
शुक्रदेव ‘या’ ३ राशींना बक्कळ धनलाभाची संधी देणार?
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण लाभदायक ठरु शकते. कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे या राशींना शुभ परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नोकरी- व्यवसायात लाभाचे संकेत दिसत आहेत. व्यवसायातून मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. तसेच, तुम्ही नवीन वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास सक्षम असाल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
सिंह
शुक्र ग्रहाचे भ्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरु शकते. या राशीच्या व्यक्तींना खूप लाभ होऊ शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या नोकरदारांना या काळात मोठ्या कंपनीकडून जॉबच्या संधी मिळू शकतात. या राशीच्या लोकांना व्यावसायिक प्रगती मिळेल असे संकेत आहेत. या काळात तुम्हाला गुंतवणुकीच्या चांगल्या संधी देखील मिळू शकतात. सुख, समृद्धी, संपत्ती आणि वैभव प्राप्त करू शकतात.
तूळ
शुक्राचे राशी परिवर्तन होताच तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ एखाद्या वरदानापेक्षा कमी नाही. या राशीतील मंडळींना नोकरीत फायदेशीर बदल दिसून येऊ शकतात. तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे यश मिळवू शकतात. परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. एखाद्याला दिलेले पैसे परत मिळू शकतात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)