Shukraditya Rajyog: सध्या ग्रहांचा राजा आणि यश देणारा सूर्य हा शुक्राच्या तूळ राशीत फिरत आहे. २ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्र ग्रहही तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे तूळ राशीत सूर्य आणि शुक्र एकत्र येऊन “शुक्रादित्य राजयोग” तयार होईल. हा शुभ योग १६ नोव्हेंबरपर्यंत टिकणार आहे.
सूर्य आणि शुक्र यांच्या एकत्र येण्यामुळे ३ राशींच्या लोकांना खास फायदा होणार आहे. या भाग्यवान लोकांना नोकरीत बढती मिळू शकते, व्यवसायात नफा होईल आणि प्रेम व सन्मान मिळू शकतो. चला जाणून घेऊ या कोणत्या त्या ३ राशी आहेत.
वृषभ राशी (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांना शुक्रादित्य राजयोग शुभ परिणाम देईल. अचानक धनलाभ होईल. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. प्रेमसंबंधातील तणाव संपेल. व्यवसायात प्रगतीचे मार्ग खुलतील आणि नोकरी करणाऱ्या लोकांच्या कामाचे कौतुक होईल. बढतीची शक्यता राहील. सूर्याच्या प्रभावामुळे वडिलांशी संबंध अधिक चांगले होतील.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्रादित्य राजयोग खूप शुभ ठरेल. लोकांच्या सुख आणि संपत्तीमध्ये वाढ होईल. गाडी खरेदी करण्याची संधी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. नोकरीत बढती मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. जोडीदारासोबतचा मनमुटाव संपेल आणि प्रेम वाढेल. अविवाहित लोकांना प्रेमाच्या बाबतीत यश मिळेल.
धनु राशी (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी तूळ राशीत बनणारा शुक्रादित्य राजयोग अनेक बाबतीत चांगले परिणाम देईल. लोकांची कमाई वाढेल. जुनी गुंतवणूक केल्यावर अचानक मोठा नफा मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा शुभ काळ ठरेल. प्रेमसंबंधात गहिरेपणा येईल आणि मुलांच्या कडून मदत मिळू शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
