Mesh To Meen Rashi Bhavishya In Marathi : ३० डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या आहे. अमावस्या सोमवारी रात्री ३ वाजून ५७ मिनिटांपर्यंत राहील. सोमवारी रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत वृद्धी योग जुळून येईल. तसेच रात्री ११ वाजून ५८ मिनिटांपर्यंत मूल नक्षत्र जागृत असेल. राहू काळ पहाटे ७ वाजता सुरु होईल ते सकाळ ९ वाजेपर्यंत असणार आहे.

याशिवाय आज सोमवती अमावस्या असणार आहे. ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्या आहे. सोमवती अमावस्या ही महादेवाला समर्पित असल्याने या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते. तर ही अमावस्या खऱ्या अर्थाने कोणासाठी भाग्यशाली ठरणार आहे. हे आपण ज्योतिषी विद्याधर करंदीकर यांच्याकडून जाणून घेऊया…

३० डिसेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- आध्यात्मिक प्रगती चांगली करता येईल. मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका. गृहसौख्याकडे विशेष लक्ष द्यावे. कर्जाची प्रकरणे आज टाळावीत.

वृषभ:- नवीन मित्र जोडता येतील. मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा. मनातील आकांक्षा पूर्ण होईल. काही नवीन खरेदी केली जाईल.

मिथुन:- व्यवसायात चांगला लाभ मिळेल. बँकेची कामे सुरळीत पार पडतील. वडीलांकडून मदत घेता येईल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

कर्क:- आत्मविश्वासाने वागाल. दिवस मौजमजेत घालवाल. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे. मानसिक समाधान लाभेल.

सिंह:- एखादी चांगली संधी चालून येईल. दानधर्म कराल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो. धार्मिक स्थळाला भेट देता येईल. आज उधार देणे टाळावे.

कन्या:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल.

तूळ:- अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. मनात अकारण भीती निर्माण होऊ शकते. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका. परिस्थितीला नवे ठेऊ नका. उगाच चिडचिड करू नका.

वृश्चिक:- कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील. आपले आवडते छंद जोपासा. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. त्यांच्या आनंदाने खुश व्हाल.

धनू:- कौटुंबिक सौख्यात दिवस घालवाल. मानसिक समाधान लाभेल. जवळचे नातेवाईक भेटतील. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. मनातील चिंता दूर साराव्यात.

मकर:- लहान प्रवास घडेल. कामात पत्नीची साथ मिळेल. भावंडांशी सुसंवाद साधला जाईल. मानसिक चांचल्य जाणवेल. कसलीही हार मानू नका.

कुंभ:- कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्यावे. चोरांपासून सावध राहावे. जामीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा. मामाकडून मदत घेता येईल.

मीन:- मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. त्यांचे कोडकौतुक कराल. दिवस आनंदात जाईल. प्रकृतीत सुधारणा होईल. शैक्षणिक प्रश्न सुटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर