Sun Nakshatra Parivartan 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींवर पडतो. पंचांगानुसार ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सूर्य नक्षत्र परिवर्तन करणार आहे. २ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री १० वाजून ४५ मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रातून आश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. ज्याचा शुभ परिणाम काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. या नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने काही राशींना प्रत्येक कामात यश मिळेल. सर्व इच्छा पूर्ण होतील.

सूर्याचे नक्षत्र परिवर्तन (Sun Nakshatra Parivartan 2024)

मिथुन

सूर्याच्या आश्लेषा नक्षत्रातील प्रवेशाने मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात प्रत्येक कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींच्या साहस आणि आत्मविश्वासात वाढ होईल. आर्थिक परिस्थिती दूर होईल. नोकरी-व्यापारात वाढ होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. मानसिक तणाव दूर होईल. धार्मिक कार्यात मन रमेल, मन शांत राहिल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्याचा आश्लेषा नक्षत्रातील प्रवेश खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळेल. लक्ष्य प्राप्त करण्यात यशस्वी राहाल. आरोग्य समस्या दूर होतील. आई-वडिलांची खूप साथ मिळेल. दूरचे प्रवास घडतील. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वरिष्ठांची मदत मिळेल. नव्या वस्तू खरेदी कराल.

हेही वाचा: पुढचे २४४ दिवस पैसाच पैसा! शनीच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार सुख-समृद्धी अन् बक्कळ पैसा

वृश्चिक

सूर्याच्या आश्लेषा नक्षत्रातील प्रवेश वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. करिअरमधील समस्या दूर होतील. आर्थिक समस्या दूर होतील, आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)