वैदिक ज्योतिषानुसार सूर्याने १४ जानेवारीला मकर राशीमध्ये प्रवेश केला आहे. तसेच या काळात मंगळ आणि गुरू यांनीही त्यांच्या राशी बदलल्या आहेत. मंगळ आणि गुरू हे दोघेही सूर्याचे मित्र आहेत. त्याचबरोबर सूर्याचे मकर राशीत आगमन झाल्यामुळे सूर्याचाकेंद्रीय प्रभाव मेष राशीवर आला आहे. म्हणूनच, सूर्याच्या केंद्रीय प्रभावाबद्दल आणि सूर्य आणि मंगळाच्या राशी बदलांबद्दल सांगणार आहोत, यासह, मकर राशीमध्ये शुक्र, मंगळ आणि बुध यांच्या युतीमुळे कोणत्या राशींचे भाग्य चमकेल. तसेच, या राशींच्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

मेष राशी

सूर्याचा मध्यवर्ती प्रभाव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण करिअरच्या घरावर सूर्याने राशी बदलली आहे आणि केंद्रीय प्रभाव मेष राशीवर आला आहे. तसेच गुरू मेष राशीमध्ये स्थित असून मेष राशीचा स्वामी भाग्यस्थानात आहे आणि भाग्य स्थानाचा स्वामी गुरू लग्न घरात आहे. त्यामुळे मेष राशीच्या लोकांचे नशीब उजळू शकते. तसेच या काळात तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. या काळात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल.

Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Loksatta anvyarth Naxalites killed in Kanker district of Chhattisgad
अन्वयार्थ: आता दीर्घकालीन उपायच गरजेचा..
Average life expectancy of Indians
आनंदाची बातमी! भारतीयांच्या सरासरी आयुर्मानात होतेय वाढ; जाणून घ्या कारणे…
glacier outburst uttarakhand
केदारनाथमध्ये पुन्हा प्रलय येऊ शकतो का? हिमनदी तलावफुटीच्या दुर्घटनांमध्ये होतेय वाढ; कारण काय?

हेही वाचा – फेब्रुवारीमध्ये बुध आणि शुक्रची ‘या’ राशींवर होईल कृपा; लक्ष्मी नारायण योगामुळे उजळणार नशीब; कमावणार पुष्कळ धन-संपत्ती

कर्क राशी

सूर्यदेवाचा मध्यवर्ती प्रभाव कर्क राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण सूर्य तुमच्या गोचर कुंडलीच्या सातव्या घरात स्थित आहे आणि त्याचा केंद्रीय प्रभाव गुरूवर म्हणजेच करिअरच्या घरात आहे. तसेच, गुरू पंचम दृष्टीने तुमच्या वित्त घराकडे पाहत आहे. त्यामुळे यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. करिअरमध्ये प्रगती होईल. तसेच, जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तेथे तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होईल. पण यावेळी वैवाहिक जीवन काहीसे तणावपूर्ण राहू शकते.

हेही वाचा – २२ जानेवारी पंचाग: शुभ नक्षत्रात अमृत सिद्धी योग, मेष ते मीन ‘या’ १२ राशींना आज कसे लाभेल सुख? हाती येईल अधिकार

तुला राशी

सूर्यदेवाचा केंद्रीय प्रभाव तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीत सूर्यचा तुमच्या वैवाहिक जीवनावर केंद्रीय प्रभाव आहे. त्यामुळे यावेळी तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभावही वाढेल. तुम्हाला मालमत्तेद्वारे लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. त्याचबरोबर ज्या लोकांचे काम परदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला लाभ मिळू शकतो. यावेळी, तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता.