ग्रह एका विशिष्ट वेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात या बदलांचा परिणाम प्रत्येक राशीवर कमी-अधिक प्रमाणात होत असतो. सूर्याला शक्तीचा कारक म्हणतात. आता ग्रहांचा राजा मानल्या जाणाऱ्या सूर्याने कन्या राशीत प्रवेश केला असून ते १८ ऑक्टोबरपर्यंत कन्या राशीत राहतील. यामुळे या काळात काही राशींचं नशीब अगदी सूर्याप्रमाणे चमकण्याची शक्यता आहे, चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

कोणत्या राशींना मिळणार लाभ?

सिंह राशी

सिंह राशीच्या मंडळीसाठी सुर्यदेवाचे गोचर फलदायी ठरु शकते. या राशीच्या लोकांना ठरलेल्या योजनांमध्ये अपेक्षित यश मिळू शकते. सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश या काळात मिळू शकते. प्रेमाची साथ लाभल्याने मानसिक ताण दूर होऊ शकतात. या राशीतील लोकांना एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. येत्या काळात पैसे कमवण्याची संधी मिळू शकते.

(हे ही वाचा : बारा वर्षांनी देवगुरु वक्री झाल्याने चार महिने ‘या’ राशींना देणार अपार पैसा? माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकता कोट्याधीश )

धनु राशी

सुर्यदेवाचे गोचर झाल्याने हा काळ धनु राशींच्या लोकांसाठी आनंदाचा व अनुकूल ठरु शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख, संपत्ती आणि समृद्धीची शक्यता निर्माण होत आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही हा काळ चांगला ठरु शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. 

मिथुन राशी

या गोचरच्या काळात मिथुन राशीच्या लोकांना बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला धार्मिक कार्यातून आनंद मिळू शकतो, तुमच्या नोकरीत प्रगती होऊ शकते. व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारल्याने कौटुंबिक वातावरणही चांगलं राहू शकते. जुन्या आजारातून या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)