Surya Nakshatra Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. प्रत्येक महिन्याप्रमाणे तो केवळ राशी बदलत नाही, तर नक्षत्रही बदलतो. या नक्षत्र परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. कारण- त्याचा सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत असल्याचं जाणवतो. द्रिक पंचांगाच्या माहितीनुसार, सूर्य १९ नोव्हेंबर रोजी शनिदेवांच्या अधिपत्याखालील अनुराधा नक्षत्रात प्रवेश करणार असून, २ डिसेंबरपर्यंत तो या नक्षत्रात राहणार आहे. सध्या सूर्य विशाखा नक्षत्रात आहे. या बदलामुळे काही राशींच्या लोकांना भाग्याचा हात लाभण्याची शक्यता आहे. शनी नक्षत्रातील सूर्याचा हा प्रवास काहींना यश, पैसा आणि प्रगतीकडे नेऊ शकतो, पाहू या कोणत्या राशींवर या ग्रहस्थितीचा जास्त प्रभाव पडू शकतो.

१९ नोव्हेंबरपासून खुलणार नशिबाचा दरवाजा! ‘या’ राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा?

मिथुन (Gemini)

सूर्याचं हे नक्षत्र परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभफलदायी ठरू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नव्या संधी उभ्या राहण्याची शक्यता आहे. दीर्घ काळापासून थांबलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. नोकरीत प्रतिष्ठा वाढण्याचे, वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याचे संकेत आहेत. आर्थिक पातळीवर स्थैर्य येऊ शकते. कौटुंबिक नात्यांमध्ये समजुतदारपणा वाढेल, दाम्पत्यजीवनात सौख्य जाणवेल.

सिंह (Leo)

सूर्य सिंह राशीचा स्वामीच असल्याने, या राशीवर या नक्षत्र परिवर्तनाचा सकारात्मक आणि उर्जावान प्रभाव पडण्याची शक्यता आहे. हा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी नव्या चांगल्या प्रारंभाचा असू शकतो. कामात चांगली बातमी मिळू शकते, करिअरमध्ये वाढीची शक्यता आहे. नवीन योजना किंवा प्रकल्प यशस्वी होण्याची चिन्हं आहेत. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील.

वृश्चिक (Scorpio)

सूर्याचं शनी नक्षत्रातील आगमन वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही शुभदायक ठरू शकतं. ज्यांना नोकरी मिळत नव्हती, त्यांच्यासाठी सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. पैसा कमावण्यासाठी नवे मार्ग खुले होऊ शकतात. नव्या व्यक्तींशी ओळख होईल, ज्यातून भविष्यात फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा जाणवेल. मन शांत आणि सकारात्मक राहील, अशी शक्यता आहे.

एकूण प्रभाव काय सांगतो?

१९ नोव्हेंबरपासून सूर्य शनी देवाच्या अधिपत्याखालील अनुराधा नक्षत्रात प्रवेश करताच गंभीरता, जबाबदारी व स्थैर्याचा काळ सुरू होऊ शकतो. काही राशींसाठी हा काळ यश, सन्मान व आर्थिक प्रगतीचा असेल; तर काहींसाठी तो आत्मपरीक्षण आणि नव्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)