Surya In Magha Nakshatra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह विशिष्ट अंतराने त्यांच्या राशी चिन्हांसह नक्षत्र बदलतात. १६ ऑगस्ट रोजी देवाचा अधिपती सुर्य मघा नक्षत्रात प्रवेश करेल. मघा नक्षत्रावर केतू ग्रहाचे वर्चस्व आहे, अशा स्थितीत सूर्याच्या राशीत प्रवेशाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा ३ राशी आहेत ज्यांचे यावेळी भाग्य चमकू शकते. तसेच लोकांना सन्मान आणि प्रतिष्ठा मिळू शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत भाग्यशाली राशी…

वृश्चिक राशी

सूर्यदेवाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते. तसेच, या काळात तुम्ही लोकप्रिय होऊ शकता. तसेच, यावेळी तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. त्याबरोबर विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ आणि फलदायी असणार आहे. उच्च शिक्षणात यश मिळेल. ज्या जोडप्यांना संततीच्या सुखाची इच्छा आहे, त्यांची इच्छा यावेळी पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. यावेळी तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

हेही वाचा – १८ वर्षानंतर सप्टेंबरमध्ये निर्माण होईल सुर्य आणि केतुची युती! ‘या’ राशींचे चांगले दिवस सुरु होणार

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचा नक्षत्र बदल शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप मजबूत असेल. तसेच तुमचे उत्पन्नही प्रचंड वाढेल. तसेच, तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही यावेळी जेवढे पैसे खर्च कराल, ते तुम्हाला लवकरच दुप्पट परतावा मिळेल. नोकरदार लोकांनाही या काळात त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हे शुभ ठरेल. म्हणजे त्यांना काही परीक्षेत यश मिळू शकते. यावेळी तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल.

हेही वाचा – १० दिवसांनंतर पैसाच पैसा; गुरूचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना देणार ज्ञान, सुख आणि संपत्तीचे सुख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्क राशी

सूर्यदेवाच्या नक्षत्रातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यावेळी तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तसेच या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते. व्यवसायात तुम्हाला दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती मिळेल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या पालकांकडूनही आर्थिक फायदा होईल. तसेच नोकरदार लोकांना नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहील.