Sun Transit in Ardra Nakshatra: ग्रहांचा राजा सूर्य महिन्यातून एकदा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. सूर्य राशी परिवर्तनासह नक्षत्र परिवर्तनही करतो ज्याचा काही राशींवर शुभ तर काही राशींवर अशुभ प्रभाव पडतो. सध्या सूर्य मिथुन राशीत आणि मृगशिरा नक्षत्रामध्ये विराजमान आहे. येत्या २२ जून रोजी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी सूर्य मृगशिरा नक्षत्रातून आर्द्रा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. सूर्याच्या या नक्षत्र परिवर्तनाने १२ राशीपैकी काही राशीच्या व्यक्तींवर अशुभ प्रभाव पाहायला मिळेल.
‘या’ तीन राशींना होणार नुकसान
वृषभ (Vrushabh Rashi)
सूर्याच्या राहूच्या नक्षत्रातील प्रवेशाने वृषभ राशीच्या या काळात तुमच्या आयुष्यात विविध प्रकारच्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात सावध राहा. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. तणावाचा सामना करावा लागेल. तसेच व्यर्थ पैसे खर्च होतील. त्यामुळे या काळात शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या, कोणत्याही कामाच घाई करू नका. स्वार्थी लोकांपासून दूर रहा. जोडीदारीची प्रकृती बिघडू शकते.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्याचे नक्षत्र परिवर्तन फारशी लाभदायी ठरणार नाही. या राशीच्या सूर्य अष्टम भावात राहणार आहे. या काळात तुमची आर्थिक तंगी दूर होईल. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणींचाही सामना कराला लागेल. त्यामुळे सांभाळून राहा. त्यामुळे वायफळ खर्च करू नका. तसेच कुठेही गुंतवणूक करण्यापासून दूर रहा. कामाच्या ठिकाणी विणाकारण वाद घालू नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. वाहन चालवताना सांभाळून चालवा.
मीन (Meen Rashi)
सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने मीन राशींच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतील. या काळात धनहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. आयुष्यात अडचणी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी मन लागणार नाही त्यामुळे वरिष्ठ तुमच्यावर नाराज असतील. तणावाचा सामना करावा लागेल. तसेच व्यर्थ पैसे खर्च होतील. त्यामुळे या काळात शांत राहून प्रत्येक निर्णय घ्या, कोणत्याही कामात घाई करू नका. स्वार्थी लोकांपासून दूर रहा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)