ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा ग्रहाचं एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण किंवा अस्त-उदय होतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ आहे. सूर्य ग्रह १५ मार्च रोजी मित्र रास असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्यदेवाला ज्योतिषशास्त्रात आदर आणि प्रतिष्ठेचा कारक मानला जातो. सूर्य ग्रहाच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण चार राशी आहेत, त्यांना विशेष फायदे होऊ शकतात. चला जाणून घेऊया या चार राशी कोणत्या आहेत.

वृषभ: तुमच्या राशीत सूर्याचे अकराव्या भावात भ्रमण होईल. ज्याला मिळकतीचं स्थान म्हटलं जातं. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे. या काळात असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. प्रॉपर्टी डीलिंग आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल राहील. यासह, यावेळी नवीन व्यावसायिक संबंध तयार होतील, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

मिथुन: या राशीचा सूर्य हा तिसऱ्या घराचा म्हणजेच प्रयत्न आणि शक्तीचा स्वामी आहे. यासोबतच मिथुन राशीच्या लोकांच्या दशम भावातून म्हणजेच करिअरच्या घरात सूर्याचे भ्रमण होईल. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते आणि नोकरीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची कार्यशैली सुधारू शकते. ज्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. व्यवसायातही चांगला फायदा होऊ शकतो. राजकारणात सक्रिय असलेल्यांना यावेळी पद मिळू शकते किंवा ते निवडणूक जिंकू शकतात.

Shukra Transit 2022: शुक्र ग्रहाचा कुंभ राशीत गोचर, या तीन राशींना मिळणार नशिबाची साथ

कर्क: तुमच्यासाठी तुम्ही दुसऱ्या घराचे म्हणजेच धन घराचे स्वामी आहात. तसेच, तो तुमच्या नवव्या घरात प्रवेश करेल, ज्याला भाग्यस्थान म्हणतात. त्यामुळे यावेळी तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुम्ही ज्या कामात हात घालाल त्यात तुम्हाला यश मिळेल. तसेच, यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता, जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कर्क राशीचे लोक या काळात निवडणूक जिंकू शकतात. तसेच, त्यांना पद मिळू शकते आणि तुमची लोकप्रियताही वाढेल. कर्क राशीचा स्वामी चंद्र देव आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य देव आणि चंद्र ग्रह यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Astrology: मीन राशीत २४ मार्चला तयार होणार बुधादित्य योग, ‘या’ तीन राशींना होणार फायदा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धनु: सूर्य ग्रहाचे भ्रमण तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकते. कारण सूर्यदेव नवव्या घराचा म्हणजेच भाग्य स्थानाचा स्वामी आहे. तसेच सूर्य गोचर करत चौथ्या घरामध्ये म्हणजेच मातेचे घर, सुख आणि संपत्तीमध्ये प्रवेश करत आहे. यावेळी तुम्ही व्यवसायात चांगले पैसे कमवू शकता. तसेच, व्यवसायात नवीन करार करू पाहणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. गुरु ग्रहाशी संबंधित मालमत्ता आणि व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना यावेळी फायदा होऊ शकतो. मात्र, आईच्या तब्येतीबाबत तुम्ही थोडे चिंतेत असाल. या काळात तुम्ही कोणतेही वाहन खरेदी करू शकता. तुमच्या राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार गुरु आणि सूर्य देव यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते.