२०२३ मध्ये एकूण ४ ग्रहण होणार आहेत, त्यापैकी पहिले ग्रहण हे सूर्यग्रहण असणार आहे. वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यानंतर १५ दिवसांनी चंद्रग्रहण होणार आहे. जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण सुरु होते. खरं तर सूर्य चंद्राच्या मागे लपतो आणि त्यामुळे काही काळासाठी अंधार पसरतो. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना आहेत. परंतु धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व देण्यात आले असून ग्रहणाबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत. यंदाच्या चालू २०२३ वर्षामध्ये एकूण ४ ग्रहण होणार आहेत, त्यापैकी पहिले ग्रहण हे सूर्यग्रहण असणार आहे.
वर्षातील पहिले सूर्यग्रहण एप्रिल महिन्यात होणार असून त्यानंतर लगेच १५ दिवसांनी चंद्रग्रहण होणार आहे. जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा सूर्यग्रहण सुरु होते. खरं तर सूर्य चंद्राच्या मागे लपतो आणि त्यामुळे काही काळासाठी अंधार पसरतो. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना आहेत. परंतु धर्म आणि ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व देण्यात आले असून ग्रहणाबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत.
भारतातील सूर्यग्रहणाची तारीख आणि वेळ –
२०२३ वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपर्यंत राहील. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तर ते ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर, दक्षिण आशिया, पॅसिफिक महासागर आणि पूर्व आशियामध्ये दिसणार आहे.
सूर्यग्रहणाचा प्रभाव –
सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी त्याचा प्रभाव लोकांच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. काही राशींसाठी, वर्षातील पहिले सूर्यग्रहण चांगले असणार नाही.
मेष –
हे सूर्यग्रहण मेष राशीत लागणार असल्यामुळे या राशीच्या लोकांवर याचा सर्वाधिक परिणाम होऊ शकतो. या लोकांना करिअरमध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. शिवाय तुम्हाला या काळात संयम ठेवावा लागेल.
कन्या –
कन्या राशीच्या लोकांसाठीही सूर्यग्रहण चांगले आहे असे म्हणता येणार नाही. कारण, या काळात त्यांचा कोणाशीही वाद होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल.
सिंह राशी –
सूर्य सिंह राशीचा स्वामी आहे आणि सूर्यग्रहण देखील या राशीच्या लोकांना खूप प्रभावित करेल. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळू शकणार नाही. काही कामांमध्ये अडथळा येण्याची शक्यता आहे.
मकर –
सूर्यग्रहणाचा परिणाम मकर राशीच्या लोकांवरही होऊ शकतो. या राशीतील लोकांचा खर्च वाढू शकतो आणि धनहानी होण्याचीही शक्यता. तसेच आरोग्यावरही वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.
( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)