वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येत ग्रह एका ठराविक अंतराने राशी बदलतात. ज्याचा परिणाम देश, जग आणि मानवी जीवनावर होत असतो. अशातच आता ३१ मार्च रोजी मेष राशीमध्ये बुध आणि शुक्र यांची बनत आहे. कारण ३१ मार्च रोजी बुध मेष राशीत गोचर करणार आहे, जिथे शुक्र ग्रह आधीपासूनच विराजमान असल्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग बनणार आहे. योगामुळे ३ राशींच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
सिंह राशी –
सिंह राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण योग शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीच्या नवव्या स्थानी तयार होत आहे. ज्याला नशीब आणि परदेशी स्थानाचा भाव समजलं जातं. त्यामुळे या काळात तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नशिबाची साथ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायानिमित्ताने प्रवास घडू शकतो. तसेच तुम्ही सध्या ज्या प्रॉजेक्टवरती काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळू शकते, तुम्ही भविष्यासाठी काही पैशांची बचत करु शकता. तुमची अध्यात्माची आवड वाढू शकते आणि तुम्ही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला असू शकतो.
कर्क राशी –
लक्ष्मी नारायण योग कर्क राशीच्या लोकांच्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतो. कारण हा योग तुमच्या राशीनुसार कर्माच्या आधारावर तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अनेक नवीन संधी उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय हा काळ तुम्हाला नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल ठरु शकतो. जे लोक मोठ्या कंपनीत किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतात त्यांना या काळात अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. तर व्यावसायिकांना या काळात चांगला नफा मिळू शकतो.
(हेही वाचा- २९ की ३० ‘राम नवमी’ नेमकी कधी आहे? ‘या’ शुभ मुहूर्तावर प्रभु राम भक्तांना देणार आशीर्वाद, पाहा पूजा विधी)
मिथुन राशी –
लक्ष्मी नारायण राजयोग मिथुन राशीसाठी आर्थिकदृष्ट्या शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण या राशीच्या उत्पन्नाच्या स्थानी हा योग तयार होत आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. यासोबतच विवाहित लोकांसाठी हा काळ चांगला राहू शकते. तर अविवाहितांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांचा या काळात फायदा होऊ शकतो. तर या काळात तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही जमीन मालमत्ताही खरेदी करू शकता. तसेच, जर तुम्हाला स्टॉक मार्केट आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही ते गुंतवू शकता.
( वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)