Sun Transit in 13 September: वैदिक पंचांगानुसार जसा सूर्य वेळोवेळी राशी बदलतो, तसाच तो नक्षत्रही बदलतो. सध्या सूर्य पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात आहे आणि १३ सप्टेंबर रोजी तो उत्तराफाल्गुनी नक्षत्रात जाईल. उत्तराफाल्गुनी नक्षत्राचा स्वामी स्वतः सूर्य आहे.
सूर्याचा स्वतःच्या नक्षत्रात प्रवेश मेष ते मीन राशींवर परिणाम करेल. या गोचरामुळे काही भाग्यवान राशींना चांगले फळ मिळेल. या राशींना धन, करिअर, व्यापार आणि कुटुंबात शुभ परिणाम दिसतील. चला तर मग जाणून घेऊ या सूर्य नक्षत्र गोचरामुळे कोणत्या राशी भाग्यवान ठरणार आहेत.
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीसाठी सूर्याचा नक्षत्र गोचर फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या जीवनात आनंद येईल. अविवाहितांना योग्य विवाह प्रस्ताव येऊ शकतात. व्यवसायात मजबुती येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. घरगुती अडचणी कमी होतील.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी सूर्याचा नक्षत्र बदल अनुकूल ठरेल. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रयत्न यशस्वी होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग मिळतील आणि जुन्या मार्गातूनही पैसा येईल. नातेसंबंध सुधारतील. व्यापार वाढण्याची शक्यता आहे.
सिंह राशी (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी सूर्याचा नक्षत्र गोचर चांगला ठरेल. या काळात कामाच्या ठिकाणी हवे तसे परिणाम मिळतील. स्वतःची कला दाखवण्याची संधी मिळेल. व्यापाऱ्यांना आर्थिक फायदा होईल. जमीन, घर किंवा वाहन खरेदीची शक्यता आहे. आनंद येईल. एखादी आनंदाची बातमी मिळू शकते.
तूळ राशी (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी सूर्याचा नक्षत्र बदल चांगला ठरेल. सामाजिक मान-सन्मान वाढेल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. कामांमध्ये यश मिळेल. मान-सन्मान मिळू शकतो. प्रवासाला जाऊ शकता. उत्पन्न वाढेल.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)