Sun Transit In Cancer: वैदिक पंचागनुसार, ग्रहांचे राजा सूर्य देव जवळपस एका वर्षानंत राशी परिवर्तन करणार आहे. तसेच सूर्य देवाला सरकारी नोकरी, प्रशासकीय सेवा, मान सन्मान, प्रतिष्ठेचा कारक मानले जाते. त्यामुळे सूर्य देवाच्या चालीत बदल झाला तर त्याचा परिणाम विविध क्षेत्रांवर दिसून येतो.
सूर्य देव २४ तासानंतर कर्क राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच काही राशींना करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते. जाणून घेऊ या त्या लकी राशी कोणत्या आहेत.
कन्या राशी (Kanya Zodiac)
सूर्य देवाचे गोचर कन्या राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक ठरू शकते. कारण सूर्य देव या राशीच्या गोचर कुंडलीच्या ११ व्या स्थानी प्रवेश करत आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना कमाईमध्ये चांगला नफा दिसून येईल. तसेच कमाईचे नवनवीन स्त्रोत दिसून येईल. तसेच या वेळी धनसंपत्तीची बचत करण्यात यशस्वी होऊ शकतात. या दरम्यान हे लोक
मोठी व्यावसायिक डील करण्यात यशस्वी होऊ शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगला पगार किंवा नवीन नोकरी मिळू शकते. या लोकांचे अडकलेले कामे मार्गी लागतील.
तुळ राशी (Tula Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी सूर्यदेवाचे राशी परिवर्तन नोकरी आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अत्यंत शुभ ठरू शकते. कारण सूर्य देव या राशीच्या दहाव्या भावात प्रवेश करत आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांन काम आणि व्यवसायात विशेष यश मिळू शकते. जे लोक नोकरीच्या शोधात आहे. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. जे लोक नवीन काम सुरू करण्याचा विचार करत आहे , त्यांच्यासाठ हा योग उत्तम आहे. या वेळी नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नतीचे योग जुळून येत आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. वडिलांबरोबर चांगले संबंध राहीन.
कर्क राशी (Cancer Zodiac)
या राशीच्या लोकांसाठी सूर्य देवाचे राशी परिवर्तन फायदेशीर ठरू शकते. कारण सूर्य देव या राशीच्या लग्न भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे या लोकांच्या आत्मविश्वासामध्ये वृद्धी होऊ शकते. तसेच या दरम्यान हे लोक व्यवसायात समजूतदारीने काम करेन तर त्यांना चांगला नफा मिळू शकतो. या लोकांना पार्टनरशिपच्या कामात लाभ मिळेन. तसेच जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहीन. अविवाहित लोकांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. या लोकांचा मान सन्मान वाढणार.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)