Lord Shiva Favourite Zodiac Signs: ज्योतिष शास्त्रात भगवान शिवाच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. भगवान महादेव यांना देवांचे देव मानले जाते त्यांना भैरव या नावानेही ओळखले जाते.याशिवाय भगवान शिव हे विश्वाच्या निर्मितीचा, अस्तित्वाचा आणि विनाशाचा आधार मानला जातो. असे मानले जाते की, त्याची पूजा केल्याने लोकांचे संकट दूर होतात आणि त्याची कृपा नेहमी भक्तांवर होते. त्याच वेळी २०२५ हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे. नवीन वर्ष ग्रहांच्या दृष्टीने खूप खास असेल कारण या वर्षी अनेक ग्रहांचे गोचर होणार आहे. ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवला तर काही राशींना २०२५ मध्ये भगवान शंकराचा विशेष आशीर्वाद प्राप्त होईल. भगवान शंकरच्या कृपेने या राशींचे भाग्य बदलू शकते. या राशीच्या सर्व वाईट गोष्टी सुधारल्या जाऊ शकतात. चला जाणून घेऊया या कोणत्या राशी आहेत ज्यांना नवीन वर्षात महादेवाची कृपा मिळणार आहे.

मेष
मेष राशीच्या लोकांसाठी२०२५ हे वर्ष आनंदाने भरलेले असेल. यावेळी तुम्हाला आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळू शकतात. करिअर आणि व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. जुन्या अडचणी संपतील. कोर्टाशी संबंधित प्रकरणांमध्ये तुम्हाला विजय मिळू शकेल. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील. भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.

हेही वाचा –Lucky Rashi Of January 2025: २०२५ च्या जानेवारी महिन्यात ‘या’ राशींना होणार बंपर लाभ; मिळणार नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् संपत्ती

सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन वर्ष खूप शुभ राहील. नवीन वर्षात नशीब तुम्हाला साथ देईल. या काळात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरीत बढतीच्या संधी मिळतील आणि तुमचा पगारही वाढू शकतो. व्यवसाय करणार्‍यांनाही नवीन संधी मिळतील. कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी होईल. भगवान शंकराच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी राहील आणि जीवनात मान-सन्मान वाढेल.

हेही वाचा –सूर्य गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, वर्षाच्या शेवटी मिळणार अचानक पैसा अन् धन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकर
मकर राशीसाठी २०२५ हे वर्ष सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. भगवान शंकराच्या कृपेने तुम्हाला मोठे यश मिळू शकते. समाजात तुमचा सन्मान वाढेल आणि तुमची संपत्तीही वाढेल. आरोग्य चांगले राहील आणि जीवनात सर्वत्र सुख-सुविधा वाढतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल.