Vyatipat Yog: पंचांग आणि ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य चंद्राचा व्यतिपात योग हा खास योगांपैकी एक आहे जो निर्माण झाल्याने काही राशींना खास फायदा होतो. हा योग काही राशींसाठी विशेष लाभदायी असतो. यावेळी निर्माण होणारा व्यतिपात योग ५ राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे

सूर्य चंद्राचा व्यतिपात योग

वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्र ठराविक काळाने राशी बदलतात. कित्येकदा ग्रहांचे गोचर विशेष योग निर्माण करतो. त्याशिवाय कित्येकदा ग्रहांच्या युतीमुळे राजयोग निर्माण होतात. अशा स्थितीमध्ये ज्योतिषशास्त्रानुसार २२ जून २०२५ला सूर्य-चंद्राची युतीमुळे व्यतिपात योग निर्माण होत आहे. तसे पाहता सूर्य आणि चंद्राचा व्यतिपात योग खूप चांगला मानला जात नाही म्हणजेच या योगामुळे हानिकारक असू शकतो पण यंदा सूर्य-चंद्राच्या व्यतिपात योगाचा पाच राशीच्या लोकांना अत्यंत अनुकूल आणि आर्थिक दृष्ट्‍या लाभदायी सिद्ध होऊ शकतो.

मेष राशी (Aries Zodiac sign )

सूर्य चंद्राचा व्यतिपात योग मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल मानला दात आहे. या योगाच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच या काळात अनेक प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळतात.

कर्क राशी (Cancer Zodiac Sign )

व्यतिपात योग कर्क राशीच्या लोकांसाठी शुभ आणि लाभदायी आहे. हा योगाचा प्रभाव कुटुंबात आनंद, संपत्तीसंबधीत लाभ आणि नोकरीमध्ये प्रगतीचे योग निर्माण करत आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली संधी मिळू शकतो.

सिंह राशी (Leo Zodiac Sign )

सूर्य चंद्राच्या व्यतिपात योगामुळे सिंह राशीच्या लोकांना नशीबाची चांगली साथ मिळेल. यासह नवीन योजनांमध्ये मोठे यश मिळेल. शिक्षण क्षेत्रामध्ये मोठे यश मिळू शकते. आई -वडीलांचा आशीर्वाद मिळू शकतो. समाजात मान-सन्मान वाढणार आहे.

वृश्चिक राशी( Scorpio Zodiac Sign )

व्यापारामध्ये फायदा, नवीन उत्पन्नाच्या स्त्रोतामुळे धन लाभ होऊ शकतो आणि आनंदाची बातमी मिळू शकते. व्यवसायामध्ये जबरदस्त आर्थिक लाभाचे संकेत दिसत आहे. मानसिक स्थिती चांगली असणार आहे. आरोग्याची चांगली साथ मिळणार आहे. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन राशी (Pisces Zodiac Sign)

परदेश यात्रा आणि गुंतवणुकीतून खास लाभ होऊ शकतो आणि प्रेम जीवनात यश मिळण्याचे प्रबळ योग आहेत. व्यवसायिकांना परदेशातून चांगला फायदा होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील. आर्थिक स्थिती हळू हळू प्रगती होईल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करू शकता.