शास्त्रांमध्ये अशा अनेक धातूंचे वर्णन केले गेले आहे यात सोने आणि चांदी या धातूंचे महत्त्व अधिक आहे. याशिवाय सोने आणि चांदीचे व्यावहारिक जीवनात विशेष महत्त्व आहे. या धातूंसंबंधी काही शुभ आणि अशुभ बाबींचे वर्णनही शास्त्रात केले गेले आहे. तर जाणून घेऊया, सोने-चांदीशी निगडित शुभ आणि अशुभ बाबी.

ज्योतिष शास्त्रानुसार, सोन्याचे दागिने सापडणे आणि हरवणे या दोन्हीही गोष्टी अशुभ आहेत. हेच कारण आहे की वडीलधारी माणसे सांगतात, सोने किंवा चांदीचे दागिने सापडले तर ते उचलून घरी आणू नयेत. वास्तविक, ज्योतिषशास्त्रात सोन्याचा संबंध गुरु ग्रहाशी सांगितला आहे. अशा स्थितीत सोने हरवले तर गुरू ग्रहाचा जीवनावर अशुभ प्रभाव पडतो.

पायात काळा धागा घातल्याने कोणते फायदे होतात माहित आहे का? जाणून घ्या धारण करण्याची योग्य पद्धत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • आजकाल बहुतेक लोक सोन्याची किंवा चांदीची अंगठी घालतात. शास्त्रानुसार सोन्याची किंवा चांदीची अंगठी हरवणे हे अशुभ लक्षण आहे. त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
  • शास्त्रानुसार जर कानातील दागिने हरवणे देखील एक अशुभ लक्षण आहे. यामुळे भविष्यात काही वाईट घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, नाकातील नथ किंवा इतर दागिने हरवणे हे देखील शास्त्रात अशुभ आहे. असे झाल्यास बदनामी किंवा निंदा होऊ शकते.
  • शास्त्रानुसार उजव्या पायाचे पैंजण हरवल्यास सामाजिक प्रतिष्ठा कमी होऊ शकते. त्याच वेळी, डाव्या पायाचे पैंजण हरवणे, प्रवासात अपघात होण्याचे संकेत देतात.
  • शास्त्रानुसार ब्रेसलेट किंवा बांगडी हरवणे देखील अशुभ आहे. ब्रेसलेट किंवा बांगदी हरवल्याने प्रतिष्ठा नष्ट होऊ शकते.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)