Mauni Amavasya 2024: पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. ही अमावस्या दर्श अमावस्या म्हणून सुद्धा ओळखली जाते. हिंदू धर्मानुसार ऋषी मनूचा जन्म या अमावस्येला झाला होता. या अमावस्येला भगवान विष्णू आणि शिवची आराधना केली जाते. या मौनी अमावस्येच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी हा योग जुळून आलेला आहे. या सर्वार्थ सिद्धी योग दरम्यान केलेले कामात भरपूर यश मिळते. आज मौनी अमावस्या आहे आणि या सर्वार्थ सिद्धी योग बनल्यामुळे चार राशींना फायदा होणार आहे. या राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. त्या चार राशी कोणत्या, हे आज आपण विषयी सविस्तर जाणून घेऊ या.

सिंह

सिंह राशीच्या लोकांना मौनी अमावस्या लाभदायक ठरू शकते. या लोकांची आर्थिक स्थिती चांगली राहील. मानसिक तणावातून सुटका होईल. याचबरोबर या लोकांचे मन शांत राहील. करिअरमध्ये सकारात्मक बदल होईल. मौनी अमावस्यादरम्यान यांच्या जीवनात मोठा बदल दिसून येईल.

तुळ

तुळ राशीच्या लोकांसाठी मौनी अमावस्येला जुळून आलेला सर्वार्थ सिध्दी योग फायद्याचा ठरू शकतो. या लोकांचे काम नीट चालेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला भरपूर यश मिळेल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. नवीन काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. पगारात वाढ होऊ शकते. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. या लोकांना नवी दिशा मिळेल.

हेही वाचा : Shani Dev : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वी शनि बदलणार चाल, या राशीच्या लोकांची लव्ह लाइफ येणार अडचणीत , होऊ शकतो ब्रेकअप

मकर

मौनी अमावस्या मकर राशीसाठी शुभ ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रगती होईल. थांबलेली कामे पूर्ण होतील.ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळू शकतो. धनलाभ होण्याचा योग जुळून येत आहे. याचा फायदा या लोकांच्या आर्थिक स्थितीवर दिसून येईल.

कुंभ

मौनी अमावस्येचा दिवस कुंभ राशीसाठी शुभ असेल. कामाच्या ठिकाणी सरकाऱ्यांची मदत मिळू शकते. इतरांच्या मदतीने तुम्ही तुमचे काम यशस्वीपणे पूर्ण करू शकाल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि तुम्हाला धनलाभ मिळेल. कुंभ राशीसाठी मौनी अमावस्येला जुळून आलेला सर्वार्थ सिध्दी योग चांगलाच फायदेशीर ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.