Rashi Bhavishya In Marathi 26 September 2025 : आज २६ सप्टेंबर २०२५ रोजी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असणार आहे. आज विष्कंभ योग जुळून येईल आणि विशाखा नक्षत्र जागृत असणार आहे. अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४९ मिनिटांनी सुरु होईल ते दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत असेल आणि आज राहू काळ १० वाजून ३९ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून ८ मिनिटांपर्यंत असणार आहे. उद्या नवरात्रीचा पाचवा दिवस असणार आहे. आज स्कंदमाता देवी कोणत्या राशीची इच्छा पूर्ण करणार जाणून घेऊया…

२६ सप्टेंबर २०२५ पंचांग व राशिभविष्य (Aajche Rashi Bhavishya In Marathi 26 September 2025 )

आजचे मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope In Marathi)

शांत राहून कामे करा. संमिश्र घटना घडू शकतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात. रागावर नियंत्रण ठेवावे. अधिकार्‍यांशी मतभेद संभवतात.

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope In Marathi)

कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल. सरकारी नोकरदार वर्गाने शांततेचे पालन करावे. भौतिक सुखाचा आनंद घ्याल.

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

संभ्रमात अडकून राहू नका. विनाकारण खर्च करू नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस. मित्रांशी सुसंवाद साधता येईल. जोडीदाराबरोबर मतभेद टाळावेत.

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope In Marathi)

तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जुनी येणी वसूल होतील. हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल. नातेवाईकांची गाठ पडेल. दिवस शुभ फलदायी ठरेल.

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope In Marathi)

व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील. आपले म्हणणे लोकांना पटेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा. अनामिक भीती लागून राहील. कठोर मेहनत घ्यावी लागेल.

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope In Marathi)

बोलण्यातून लोकांना आपलेसे करा. हाती घेतलेल्या कामात यश येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. कामाचे योग्य नियोजन करावे. अति श्रमाचा थकवा जाणवेल.

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope In Marathi)

प्रकृतीची काळजी घ्या. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवास काळजीपूर्वक करावा. रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल.

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope In Marathi)

प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका. हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल. अधिकार्‍यांशी मतभेद होण्याची शक्यता. सरकारी कामे अडकण्याची शक्यता. निराशाजनक विचार टाळा.

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. कोणत्याही गोष्टीची अति घाई करू नका. कामातून समाधान लाभेल. जुनी येणी प्राप्त होतील. घरगुती प्रश्न लक्षात घ्या.

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope In Marathi)

भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा. सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल. वैवाहिक जीवन उत्तम राहील. पैज जिंकता येईल.

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope In Marathi)

मानसिक स्थिती भक्कम करा. अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. वैवाहिक जीवन सुलभ असेल. महिला वर्गासाठी विशेष दिवस.

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope In Marathi)

बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल. एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल. आरोग्याची काळजी घ्यावी. पथ्यपाणी वेळेवर सांभाळा.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर