Dainik Rashi Bhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.
आजचे राशिभविष्य लाईव्ह ४ जून २०२५ : Daily horoscope live updates In Marathi
दैनिक मीन राशिभविष्य (Today’s Pisces Horoscope In Marathi)
बदल लक्षात घेऊन वागावे. सामाजिक गोष्टींची जाणीव जागृत ठेवा. वादविवादात सहभागी होऊ नका. हस्तकलेचे कौतुक केले जाईल.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Today’s Aquarius Horoscope In Marathi)
क्षुल्लक गोष्टींवरून गैरसमज होऊ शकतात. इतरांची तुमच्याकडून मदतीची अपेक्षा राहील. घरगुती वातावरण प्रसन्न ठेवावे. मुलांच्या खोडकरपणाला आळा घालावा. निश्चयावर ठाम राहा.
दैनिक मकर राशिभविष्य (Today’s Capricorn Horoscope In Marathi)
काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. हातातील कामे वेळेवर पूर्ण होतील. दिवसभर कामात गुंतून राहाल. चिकाटी सोडून चालणार नाही. पित्त विकाराचा त्रास संभवतो.
दैनिक धनू राशिभविष्य (Today’s Sagittarius Horoscope In Marathi)
भावंडांकडून त्रास संभवतो. आरोग्यात काही प्रमाणात सुधारणा होईल. कौटुंबिक खर्चाचा ताळमेळ जुळवावा. गरज नसेल तर प्रवास टाळवा. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Today’s Scorpio Horoscope In Marathi)
वैचारिक सैरभैरता टाळावी. गृह शांति जपण्याचा प्रयत्न करावा. जोडीदारावर खर्च करावा लागेल. मतभिन्नता दर्शवून चालणार नाही. अती विचारात वेळ वाया घालवू नका.
दैनिक तूळ राशिभविष्य (Today’s Libra Horoscope In Marathi)
स्वतंत्र वृत्तीचे अवलोकन कराल. मुलांचे वागणे विरोधी वाटेल. मनाच्या चंचलतेवर मात करावी. साथीदाराचा विरह संभवतो. काळाची पावले ओळखून वागा.
दैनिक कन्या राशिभविष्य (Today’s Virgo Horoscope In Marathi)
जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. मुलांबाबत काहीशी चिंता लागून राहील. अधिक कष्ट पडले तरी कामे पूर्ण होतील. कामात घाई-गडबड करू नका.
दैनिक सिंह राशिभविष्य (Today’s Leo Horoscope In Marathi)
सरकारी कामाला गती येईल. मित्रांची मोलाची मदत मिळेल. कामातील ताणतणाव दूर होईल. विरोधकांचा विरोध मावळेल . जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी.
दैनिक कर्क राशिभविष्य (Today’s Cancer Horoscope In Marathi)
अधिकारी लोकांची तुमच्यावर मर्जी राहील. कामात स्त्री वर्गाचा हात लागेल. पत्नीच्या कमाईचा लाभ होईल. सहकार्यांशी जमवून घ्या. मित्रांकडून लाभाची शक्यता.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Today’s Gemini Horoscope In Marathi)
जोडीदाराची मर्जी सांभाळावी लागेल. गप्पांच्या ओघात गैरसमज वाढवू नका. प्रवासात सावधानता बाळगावी. कामापेक्षा इतर गोष्टींकडे कमी लक्ष द्या. हजरजबाबीपणा दाखवताना सावध रहा.
१२ वर्षांनतर गुरू उदयामुळे निर्माण होईल शक्तीशाली धनलक्ष्मी राजयोग! या राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ, अचानक वाढेल बँक बॅलन्स
दैनिक वृषभ राशिभविष्य (Today’s Taurus Horoscope In Marathi )
कामाच्या ठिकाणी तुमचा रूबाब राहील. तांत्रिक कामात चाल ढकल करू नका. गोड बोलून कार्यभाग साधावा. हाताखालील नोकरांचे सहकार्य मिळेल. काही अनपेक्षित बदल घडून येतील.
दैनिक मेष राशिभविष्य (Today’s Aries Horoscope In Marathi )
कामावरील त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. दिवस आपल्याला अनुकूल आहे. कौटुंबिक खर्च वाढता राहील. आर्थिक कामे सुरळीत पार पडतील. इतरांना मनापासून मदत कराल.
२०२७पर्यंत या राशींवर होईल शनीदेवाची विशेष कृपा, मिळणार अपार पैसा अन् पद-प्रतिष्ठा, प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्याचे योग
९ दिवसांनी माता लक्ष्मी 'या' राशींचे नशीबाचे चक्र फिरवणार! सुखाचे दिवस येणार? शुक्रदेवाचे नक्षत्र परिवर्तन होताच मिळू शकतो भरपूर पैसा
९ जूनपासून केंद्र योगाने 'या' राशींना लागणार लॉटरी! बुध व शनीच्या आशीर्वादाने नोकरीत भरघोस पगारवाढ; प्रमोशन अन् संपत्तीत वाढ
ऑगस्टमध्ये 'या' राशींचे लोक होणार अमाप श्रीमंत! केतू-बुधाच्या युतीने बदलणार आयुष्य; मिळेल बक्कळ पैसा, यश
Horoscope Today: मेष ते मीनपैकी कोणाच्या नशिबात आज विठ्ठलाची कृपा? कोणाला प्रिय व्यक्तीचा सहवास तर कोणाला होईल धनलाभ; वाचा तुमचे राशिभविष्य
Today Horoscope 4 June 2025