Dainik Rashi Bhavishya Updates : आज ९ सप्टेंबर २०२५ रोजी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी असणार आहे. द्वितीया तिथी रात्री ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज सर्वार्थ सिद्धि योग रात्री ६ वाजून ८ मिनिटांपर्यंत जुळून येणार आहे. तसेच उत्तरा भाद्रपद नक्षत्र संध्याकाळी ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तर सर्वार्थ सिद्धि योग जुळून आल्याने तुमचे नशीब कसे खुलणार जाणून घेऊया…

Live Updates

Horoscope Today in Marathi Live 9 September 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह ९ सप्टेंबर २०२५

19:10 (IST) 9 Sep 2025

सूर्यग्रहण लवकरच लागणार! 'या' ५ राशींवर होणार शुभ - अशुभ परिणाम, सुतक काळ कधी? नेमकी वेळ जाणून घ्या...

Surya Grahan 2025: सप्टेंबर महिन्यात १५ दिवसांत २ ग्रहण लागणार आहेत. ७ सप्टेंबरला शनीच्या कुंभ राशीत चंद्रग्रहण झाले आहे. आता २१ सप्टेंबरला कन्या राशीत सूर्यग्रहण होणार आहे. हे सूर्यग्रहण सर्व १२ राशींवर परिणाम करेल पण काही राशींवर त्याचा जास्त परिणाम होईल. ...सविस्तर बातमी
17:16 (IST) 9 Sep 2025

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today in Marathi)

दिवस मंगलदायी ठरेल. मोठ्या माणसांच्या गाठी पडतील. कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल. चर्चा करताना संयम बाळगावा. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

17:00 (IST) 9 Sep 2025

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे. एखादी आनंदी बातमी समजेल. मात्र खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल.

16:45 (IST) 9 Sep 2025

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

दिवस धावपळीत जाईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. प्रलोभनांना बळी पडू नये. वडीलांची मदत घेऊन कामे होतील. मान, सन्मान वाढेल.

15:46 (IST) 9 Sep 2025

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope In Marathi)

दिवस समाधानाचा जाईल. कटू शब्द टाळा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. व्यापारातील लाभ शांतता प्रदान करतील. नवनवीन खर्च उद्भवतील.

14:38 (IST) 9 Sep 2025

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

आळस झटकून कामाला लागावे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. विचार भरकटू देऊ नका. समोरील संधीचे सोने करावे.

13:52 (IST) 9 Sep 2025

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

मनासारखी गोष्ट घडेल. हवी असलेली वस्तु सापडेल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. अपेक्षित यशाकडे वाटचाल चालू राहील. स्थावर मालमत्तेतून लाभाची शक्यता.

13:26 (IST) 9 Sep 2025

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

हातातील कामे पूर्ण करावीत. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. समस्येतून मार्ग निघेल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करा. स्त्री सहकार्‍यांची मदत मिळेल.

12:45 (IST) 9 Sep 2025

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. घाई करू नये. व्यावसायिक निर्णय संयमाने घ्यावेत. येणी वसूल होतील.

11:21 (IST) 9 Sep 2025

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

घरात वातावरण आनंदी राहील. प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. खर्च वाढते राहतील.

11:05 (IST) 9 Sep 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Daily Horoscope In Marathi)

कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. दिवसाची सुरवात चांगली होईल. बुद्धी कौशल्याने कामे मार्गी लावावीत. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी.

10:39 (IST) 9 Sep 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

आहाराची पथ्ये पाळा. खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. दिवस मध्यम फलदायी. हातातील कलेला वाव द्यावा. कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

09:54 (IST) 9 Sep 2025

मेष आजचे राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

प्रेमाच्या व्यक्तींशी गाठ पडेल. नवीन व्यावसायिक हालचाली सुरू होतील. मेहनत फळाला येताना दिसेल. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

09:09 (IST) 9 Sep 2025

नोव्हेंबरमध्ये शनी-गुरू होणार वक्री, 'या' तीन राशी व्यक्ती देवी लक्ष्मीच्या अखंड कृपेने सोन्यासारखा पैसा कमावणार

Shani-Guru Vakri in November 2025: या दोन्ही ग्रहांचे हे परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी नक्कीच लाभदायी असेल. ...वाचा सविस्तर
08:36 (IST) 9 Sep 2025

सर्वार्थ सिद्धी योगाचा प्रभाव तुमच्या राशीच्या कुंडलीत काय बदल घडवणार? कोणाच्या दिवसाची सुरुवात चांगली होणार? वाचा तुमचे राशिभविष्य

Dainik Rashi Bhavishya In Marathi 9 September 2025 : तर आठवड्याची नवीन सुरुवात तुमच्या राशीची कशी असणार जाणून घेऊयात... ...वाचा सविस्तर

Horoscope Today Live Updates 9 September 2025

Horoscope Today Live Updates 9 September 2025