Daliy Horoscope Updates:वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्व आहे. हे ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात. ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राश आहेत, या बारा राशींपैकी काही राशींवर ग्रह, नक्षत्र गोचर आणि ग्रहांच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूल्यांक शोधला जातो आणि त्यानुसार व्यक्तीचे स्वभाव आणि भविष्याविषयी अंदाज बांधला जातो. याशिवाय चाणक्य नितीच्या माध्यमातूनही व्यक्तीला समाजात वावरताना कोणत्या निती नियमांचे पालन केले पाहिजे याविषयीची माहिती दिली जाते. दरम्यान आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाईल जाणून घेऊ…

Live Updates

Today Horoscope 14 June 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह १४ जून २०२५

19:08 (IST) 14 Jun 2025

१२ तासांनी 'या' राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी; त्रिग्रही राजयोगाने मिळणार नुसता पैसे अन् प्रचंड यश

Triple Rajyog 2025 : १५ जून रोजी सूर्य मिथुन राशीत प्रवेश करेल आणि तो गुरु आणि बुध यांच्या युतीत असेल, ज्यामुळे त्रिग्रही, बुधादित्य आणि गुरु आदित्य योग निर्माण होत आहे, ज्यामुळे तीन राशींना खूप फायदे मिळू शकतात. ...सविस्तर वाचा
16:57 (IST) 14 Jun 2025

Weekly Horoscope : या आठवड्यात ५ राशीच्या लोकांना मिळेल अचानक धनलाभ, नव्या नोकरीचे योग! वाचा, साप्ताहिक राशीभविष्य…

जूनच्या या आठवड्यात बुधादित्य, गुरु आदित्य, केंद्र, षडाष्टक, अर्धकेंद्र असे राजयोग निर्माण होणार आहे. ...सविस्तर वाचा
13:25 (IST) 14 Jun 2025

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

मुलांवरील खर्च वाढू शकतो. जवळचे नातेवाईक गोळा होतील. मनाची द्विधावस्था टाळावी लागेल. वादाच्या मुद्द्यापासून चार हात दूर रहा. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल.

13:24 (IST) 14 Jun 2025

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

मुलांशी गप्पागोष्टी करण्यात रमून जाल. कामे अधिक जोमात पार पाडाल. चटकन येणार्‍या रागावर आवर घालावा. पुढील काळासाठी उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवा. आवडते पदार्थ खायला मिळतील.

13:24 (IST) 14 Jun 2025

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

तुमच्या विषयीचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करावा. जुन्या गोष्टी उकरून काढत बसून नका. सकारात्मक विचारसरणीतून मार्गक्रमण करावे. कफ विकाराचा त्रास संभवतो. अविचाराने निर्णय घेऊ नका.

13:24 (IST) 14 Jun 2025

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

व्यापारातून चांगला नफा संभवतो. पत्नीची व्यवहारकुशलता दिसून येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कामात वडीलधार्‍यांचे सहकार्य लाभेल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.

13:24 (IST) 14 Jun 2025

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

अती विचाराने ताण येईल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

13:24 (IST) 14 Jun 2025

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

केलेल्या कामातून समाधान मिळेल. क्षुल्लक गोष्टी मनाला लावून घेऊ नका. ठामपणे निर्णय घेणे गरजेचे आहे. कामातील शिस्त मोडून चालणार नाही. प्रवासाची आवड पूर्ण होईल.

13:23 (IST) 14 Jun 2025

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. भागीदारीच्या व्यवसायात उत्कृष्ट लाभ मिळेल. कामानिमित्त दिवसभर बाहेर राहाल. व्यावहारिक चातुर्य दाखवावे लागेल. पुढील परिस्थितीचा योग्य अंदाज बांधण्याचा प्रयत्न करावा.

13:23 (IST) 14 Jun 2025

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी खटपट कराल. कामे पूर्ण करण्यासाठी दिवसभर झटाल. हातातील अधिकार वापरण्याची संधी मिळेल. मानसिक चंचलता जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.

12:00 (IST) 14 Jun 2025

३ ग्रहांचा मोठा गेम! उद्यापासून 'या' राशींच्या व्यक्तींचाच वाजणार डंका; शुभ योगांमुळे तुमच्या हाती येईल बक्कळ पैसा? श्रीमंतीचे संकेत..

Grah Gochar 2025: १२ वर्षांनंतर मिथुन राशीत तीन शुभ योग घडून येत आहे. त्यामुळे काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येण्याची शक्यता आहे. ...सविस्तर वाचा
10:59 (IST) 14 Jun 2025

बुध देणार बक्कळ पैसा; चंद्राच्या नक्षत्रातील प्रवेशाने 'या' तीन राशींना करिअर अन् नोकरीत मिळणार प्रमोशन

Budh Gochar 2025: पंचांगानुसार, २२ जून रोजी रात्री ९ वाजून ३३ मिनिटांनी बुध चंद्राच्या कर्क राशीमध्ये प्रवेश करणार असून तो ३० ऑगस्टपर्यंत या राशीत राहील. या राशी परिवर्तनाचा १२ राशींच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव पाहायला मिळेल. ...सविस्तर वाचा
07:49 (IST) 14 Jun 2025

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

तुमच्या धार्मिकतेत वाढ होईल. जामीनकीचे व्यवहार तूर्तास टाळा. खोटे बोलण्याने नुकसान संभवते. रहस्यमय गोष्टी जाणून घ्याव्याशा वाटतील. कागदपत्रांची नीट तपासणी करून पुढे जावे.

07:49 (IST) 14 Jun 2025

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

जलद गतीने कामे पूर्ण कराल. क्षुल्लक कारणास्तव येणारी निराशा दूर सारावी. प्रतिकूलतेतून वेळेवर मार्ग निघेल. किरकोळ अडचणीमुळे खट्टू होऊ नका. नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल.

07:48 (IST) 14 Jun 2025

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

स्वत:चे स्वत्व राखण्याचा प्रयत्न कराल. बोलण्यातून आत्मविश्वास दाखवाल. मनातील इच्छा हवी तशी पूर्ण होईल. प्रत्येक गोष्टीचा उत्तम प्रकारे आनंद घ्याल. काही कामे क्षुल्लक कारणास्तव रखडली जातील.

07:48 (IST) 14 Jun 2025

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

मानसिक गोंधळ सावरावा लागेल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल. इतरांना उदारपणे मदत कराल. गोडीने सर्वांना आपले मत पट‍वून द्याल. आर्थिक चिंता दूर होईल.

07:45 (IST) 14 Jun 2025

न्यायदेवता शनीचा मीन राशीत प्रवेश! सिंह राशीमध्ये शनीची ढैय्या सुरू! २०२७पर्यंत कसा होईल परिणाम? जाणून घ्या...

Saturn Transit 2025 : ३० वर्षांनंतर मीन राशीत आल्याने सिंह राशीला खूप फायदे मिळू शकतात. गुरुच्या घरात शनीचे आगमन सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात खूप परिणाम करणार आहे. ...अधिक वाचा
07:45 (IST) 14 Jun 2025

सूर्य, बुध आणि गुरू निर्माण करणार शक्तिशाली ब्रह्म आदित्य योग! या ३ राशींना होईल खूप फायदा! उत्पन्नात अपार वाढ होण्याचे योग

ज्योतिषशास्त्रात, हा योग खूप शुभ आणि शक्तिशाली मानला जातो. अशा परिस्थितीत, हा काळ काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो. ...सविस्तर वाचा
07:45 (IST) 14 Jun 2025

Sankashti Chaturthi Horoscope: आजची संकष्टी चतुर्थी होणार 'या' राशींसाठी खास; धन-संपत्तीसह जोडीदारचीही मिळेल साथ; वाचा तुमचे राशिभविष्य

Sankashti Chaturthi 2025 Zodiac Wise today's Horoscope | शनिवारी संकष्टी चतुर्थीला कोणावर राहील बाप्पाची कृपा; तुमची पूर्ण होईल का इच्छा? ...वाचा सविस्तर

today horoscope live updates

राशीभविष्य लाईव्ह अपडेट्स