Daliy Horoscope Live Updates : वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाला विशेष महत्व आहे. हे ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी किंवा नक्षत्र बदल करत असतात. ज्याचा परिणाम प्रत्येक राशींच्या लोकांच्या जीवनावर दिसून येतो. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राश आहेत, या बारा राशींपैकी काही राशींवर ग्रह, नक्षत्र गोचर आणि ग्रहांच्या संयोगाने निर्माण होणाऱ्या राजयोगाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरुन त्याचा मूल्यांक शोधला जातो आणि त्यानुसार व्यक्तीचे स्वभाव आणि भविष्याविषयी अंदाज बांधला जातो. याशिवाय चाणक्य नितीच्या माध्यमातूनही व्यक्तीला समाजात वावरताना कोणत्या निती नियमांचे पालन केले पाहिजे याविषयीची माहिती दिली जाते. दरम्यान आजचा दिवस १२ राशींसाठी नेमका कसा जाईल जाणून घेऊ…

Live Updates

Today Horoscope 31 July 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह ३१ जुलै २०२५

18:19 (IST) 31 Jul 2025

११ ऑगस्टपासून 'या' राशींचे चांगले दिवस सुरू! करिअरमध्ये यश तर प्रेमसंबंधांमध्ये जवळीक; वाचा तुमच्या नशिबी काय...

August Hororscope: बुध मार्गी झाल्याने ६ राशींमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. ...सविस्तर वाचा
18:19 (IST) 31 Jul 2025

१७ ऑगस्टपर्यंत 'या' ३ राशीच्या लोकांचा पैसा वाढेल! बुधादित्य योग करेल धनाचा वर्षाव; करिअरमध्ये नशीब देईल साथ

Budhaditya Yog: ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योगाला खूप शुभ आणि प्रभावी योग मानले जाते. या योगाचा परिणाम सगळ्या राशींवर होईल, पण सर्वात जास्त फायदा ३ राशींना होणार आहे. ...वाचा सविस्तर
14:05 (IST) 31 Jul 2025

रोहिणी नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो? त्यांचे करिअर, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनाबद्दल सर्वकाही जाणून घ्या

रोहिणी नक्षत्रात जन्मलेले लोक कसे असतात, त्यांचे करिअर आणि वैवाहिक जीवन कसे असते ते जाणून घ्या. ...सविस्तर वाचा
13:59 (IST) 31 Jul 2025

१ ऑगस्टपासून 'या' राशींच्या लोकांच्या जीवनाला कलाटणी, भाग्योदयाची संधी; द्विद्वादश योगाने प्रमोशन, बँक बॅलन्स अन् पगारात वाढ

Dwidwadash Rajyog 2025 : शुक्र आणि युरेनसचा द्विद्वादश योगाने १२ पैकी ३ राशींसाठी लाभदायी ठरू शकतो. ...सविस्तर वाचा
13:59 (IST) 31 Jul 2025

१ ऑगस्टपासून 'या' राशींच्या लोकांच्या जीवनाला कलाटणी, भाग्योदयाची संधी; द्विद्वादश योगाने प्रमोशन, बँक बॅलन्स अन् पगारात वाढ

Dwidwadash Rajyog 2025 : शुक्र आणि युरेनसचा द्विद्वादश योगाने १२ पैकी ३ राशींसाठी लाभदायी ठरू शकतो. ...सविस्तर वाचा
10:49 (IST) 31 Jul 2025

'या' तारखेला जन्मलेले लोक शनीदेवाच्या कृपेने होतात श्रीमंत! वयाच्या इतक्या वर्षी मिळतो भरपूर पैसा...

Shani Favourite Mulank: हे लोक मेहनतीच्या जोरावर श्रीमंत होतात. ...सविस्तर वाचा
10:48 (IST) 31 Jul 2025

Baba Vanga Predictions 2025-26: २०२५ मध्ये भूकंप अन् त्सुनामी! २०२६ मध्ये येणार आर्थिक संकट? बाबा वेंगांची भविष्यवाणी

Baba Vangas Predictions 2025: बाबा वेंगा यांचे हे भाकीत खूप चर्चेत होते. चला, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया... ...वाचा सविस्तर
10:44 (IST) 31 Jul 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

नवीन संकल्पना कृतीत उतरवा. कौटुंबिक कामात वेळ जाईल. बागकामाची आवड जोपासाल. उतावीळपणा करू नये. मित्र मंडळींचे सहकार्य घ्याल.

10:44 (IST) 31 Jul 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

ग्रहमानाची अनुकूलता लाभेल. भावंडांची मदत मिळेल. कोणालाही दुरूत्तर करू नका. मानसिक चंचलता टाळावी. प्रेमसंबंध घट्ट करण्याचा प्रयत्न करावा

10:43 (IST) 31 Jul 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

व्यायामात आळस करू नका. घरातील वातावरण खेळते राहील. दिवस मजेत जाईल. जोडीदाराच्या उत्पन्नात वाढ होईल. घरात तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल.

10:43 (IST) 31 Jul 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

दिवस प्रसन्नतेत उगवेल. काही जुने प्रश्न मार्गी लागतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. मुलांबरोबर अधिक वेळ घालवाल. छंद जोपासण्यासाठी वेळ काढा.

10:43 (IST) 31 Jul 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

आज आराम करण्याची इच्छा निर्माण होईल. प्रिय व्यक्तीची नाराजी दूर होईल. जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. कामातून समाधान लाभेल. नसती काळजी करू नका.

10:42 (IST) 31 Jul 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

व्यवसायासाठी भांडवल उपलब्ध होईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदार तुमच्यावर नाराज होऊ शकतो. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल.

10:42 (IST) 31 Jul 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

आज आशादायक ग्रहमान राहील. कामाचा जास्त बोजा घेऊ नका. वरिष्ठांची कौतुकाची थाप पडेल. दिनक्रम व्यस्त राहील. हाती घेतलेले काम तडीस न्याल.

10:42 (IST) 31 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

मोहाला बळी पडू नका. जोडीदाराविषयी मनात शंका बाळगू नका. गोड बोलून कामे करून घ्यावीत. मुलांना जबाबदारीची जाणीव करून द्यावी. कामाचा वेग वाढेल.

10:42 (IST) 31 Jul 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

काही गोष्टींचे चिंतन करावे लागेल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. प्रगतीचा मार्ग खुला होईल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

10:41 (IST) 31 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

मित्रांची बाजू जाणून घ्यावी. मानसिक चंचलता जाणवेल. समतोल विचार करून पहावा. जोडीदाराकडून सहकार्याची अपेक्षा ठेवाल. अति चिकित्सा करू नका.

10:41 (IST) 31 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

दिवस मनाप्रमाणे घालवाल. जवळच्या मित्रांची गाठ पडेल. सामाजिक जाणीव ठेवून वागाल. एखादे जुने स्वप्न पूर्ण होईल. सकारात्मक विचारातून यशस्वी व्हाल.

Today Horoscope 31 july 2025

आजचे राशीभविष्य, ३१ जुलै २०२५ (सौजन्य - फ्रिपीक)