Dainik Rashi Bhavishya Updates : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्‍या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत.

Live Updates

आजचे राशिभविष्य लाईव्ह २२ जून २०२५ : Daily horoscope live updates in Marathi

18:39 (IST) 22 Jun 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

आपलेच म्हणणे खरे कराल. अती आत्मविश्वास बाळगून चालणार नाही. उघड-उघड शत्रुत्व पत्करू नका. जमिनीचे व्यवहार मार्गी लागतील. किरकोळ दुखापत संभवते.

18:32 (IST) 22 Jun 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

बौद्धिक कामात सक्रिय राहाल. धार्मिक यात्रांचे आमंत्रण घेऊ नये. घरातील वातावरण प्रसन्न राहील. रेस-जुगारातून नुकसान संभवते. प्रवासात किरकोळ अडचणी येऊ शकतात.

18:12 (IST) 22 Jun 2025

आजचे मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope In Marathi)

जवळच्या प्रवासात काळजी घ्या. भावंडांशी दुरावा वाढू शकतो. प्रेमसौख्याला अधिक बहार येईल. मुलांशी क्षुल्लक कारणांवरून खटके उडू शकतात. करमणुकीत अधिक वेळ घालवाल.

17:18 (IST) 22 Jun 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

कष्टाला मागेपुढे पाहू नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. जोडीदाराविषयी गैरसमज वाढू शकतात. हाताखालील नोकरांचे उत्तम सहकार्य लाभेल. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

16:45 (IST) 22 Jun 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

नवीन कामात सावधानता बाळगा. कौटुंबिक कामात विशेष लक्ष घालावे लागेल. प्रणयराधनेत सक्रियता वाढेल. आर्थिक लाभापेक्षा कामाचा आनंद मिळवाल. भागिदारीतून मनाजोगा नफा मिळेल.

16:10 (IST) 22 Jun 2025

Vastu Tips : घरात किचन बांधताना 'या' ३ गोष्टी ठेवा लक्षात; झोपण्यापूर्वी करा 'हे' काम, वाचा वास्तू टिप्स

Vastu Tips For Kitchen : घरात किचन बांधताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास घरात सुख, शांती आणि आनंदी वातावरण राहील. किचनसंदर्भात काही वास्तू टिप्स जाणून घेऊ… ...सविस्तर बातमी
16:09 (IST) 22 Jun 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

कमी श्रमातून चांगला लाभ होईल. वरिष्ठांना नाराज करून चालणार नाही. अपचनाचा त्रास जाणवेल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी लागेल. महिलांना उत्तम गृहिणी पदाचा लाभ

15:29 (IST) 22 Jun 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

विशाल दृष्टिकोन ठेवावा लागेल. कलेला पोषक वातावरण मिळेल. तुमच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळेल. भौतिक सुखापासून दूर राहाल. पत्नीचे वर्चस्व जाणवेल.

15:13 (IST) 22 Jun 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा. तुमच्यातील चांगल्या गुणांचे कौतुक केले जाईल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. मिळालेल्या लाभाबाबत समाधानी रहा. इतरांचे मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करा.

14:50 (IST) 22 Jun 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

फार विचार करत बसू नका. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. डोळे झाकून कोणतेही कृत्य करू नका. फसवणुकीपासून सावध रहा. मानसिक चंचलता जाणवेल.

13:28 (IST) 22 Jun 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

मानसिक आंदोलनाला आवर घालावी. मनातील विचित्र कल्पना काढून टाका. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. काही गोष्टी इच्छेविरूद्ध कराव्या लागतील. महत्त्वाची कामे आज टाळावीत.

12:20 (IST) 22 Jun 2025

नुसता पैसा; तब्बल ३० वर्षांनंतर शनी आणि बुधाने निर्माण केला समसप्तक राजयोग, 'या' तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

Samsaptak Yog 2025: हा राजयोग तब्बल ३० वर्षानंतर निर्माण होणार असून या राजयोगाच्या प्रभावाने १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल. ...सविस्तर बातमी
11:49 (IST) 22 Jun 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. प्रेमाच्या दृष्टीने मैत्रीत सुधारणा होईल. काही कौटुंबिक चिंता सतावतील. मनाजोगी खरेदी करता येईल. हौस भागवणे शक्य होईल.

10:40 (IST) 22 Jun 2025

पुढचे ७० दिवस पडणार पैशांचा पाऊस! 'या' पाच राशींचा वाढणार बँक बॅलेन्स, बुध गोचरमुळे मिळेल अपार श्रीमंती

Budh Gochar 2025 : २२ जून रोजी बुध ग्रह कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे आणि ३० ऑगस्टपर्यंत कर्क राशीमध्ये विराजमान राहणार आहे. जाणून घेऊ या कोणत्या राशींसाठी बुध गोचर फायदेशीर ठरणार आहे. ...सविस्तर वाचा
10:04 (IST) 22 Jun 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

गैरसमजुतीतून त्रास संभवतो. डोळ्यांची तपासणी करावी लागेल. सामुदायिक गोष्टींत फार लक्ष घालू नका. जवळचा प्रवास तूर्तास टाळावा. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल.

08:33 (IST) 22 Jun 2025

Daily Horoscope: बुधाचे राशी परिवर्तन मेष ते मीनला देणार का प्रत्येक कामात यश? वाचा रविवारचे राशिभविष्य

Daily Horoscope in Marathi, 22 June 2025: बुधाचा कर्क राशीत प्रवेश तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल की नुकसान होईल हे आपण जाणून घेऊया... ...सविस्तर बातमी

आजचे राशिभविष्य लाईव्ह २२ जून २०२५

आजचे राशिभविष्य लाईव्ह २२ जून २०२५